मुंबई, दि. २. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पुणे कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर गुरुवार दि. ३ मार्च व शुक्रवार दि. ४ मार्च २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदक सुप्रिया कु-हाडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयांतर्गत उपलब्ध पर्यटक निवास व उपहारगृहे, पुणे विभागातील पर्यटन स्थळे, शासकीय कर्मचा-यांकरिता असलेल्या सवलती, पर्यटक निवासामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा, भविष्यातील नवीन प्रकल्प, योजना आदी विषयांची सविस्तर माहिती. दीपक हरणे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.