नीरा नरसिंगपूर,दि.:२ :- निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर हे गाव म्हणजे पुणे जिल्ह्याचे शेवटचे टोक आणि पृथ्वीचा मध्यबिंदू असणारे असे हे एक आगळेवेगळे गाव मानले जाते कारण येथे प्रत्येकाचा वाढदिवस हा सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन करतात तसेच या गावांमध्ये येणारे मंत्री, शासकीय अधिकारी आणि भाविक यांचे स्वागत अतिशय छान पद्धतीने केले जाते तसेच शासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार पाहुणचार अगदी मनापासून केला जातो. या गावामध्ये श्री लक्ष्मी नरसिंहाचे पुरातन काळातील अतिशय भव्य असे मंदिर आहे आणि येथे नीरा नदी व भीमा नदी यांचा संगम झालेला आहे. महाराष्ट्र मध्ये नाशिक आणि नीरा नरसिंगपूर या दोन ठिकाणी धार्मिक विधी केले जातात त्यापैकी नीरा नरसिंगपूर येथे शेजारपाजारच्या राज्यातून तसेच जिल्ह्यातून अनेक भाविक हे विधी करण्यासाठी आणि देवदर्शनासाठी येतात. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी गावासाठी भरघोस असा निधी दिलेला आहे त्याच्यामुळे गावातील रस्ते,गावाचा पाण्याचा प्रश्न, गावातील लाईट हे उत्कृष्ट असे झालेले आहेत. हे गाव लवकरच पर्यटन स्थळ होणार आहे. गावामध्ये बोटिंग होणार आहे. गावातील कामे ही अंतिम टप्प्यावर चालू असून गावातील लोकांच्या मनामध्ये गावाविषयी खूप अभिमान आणि आनंद आहे.येथील नागरिक एका कुटुंबातील असल्यासारखे राहतात म्हणूनच या गावाला एक आगळेवेगळे गाव म्हणून ओळखले जाते.
निरा प्रतिनिधी :-डाॅ सिद्धार्थ सरवदे