पुणे ग्रामीण,दि०१ :- पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील अडीच वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करुन खून केल्याची घटना 15 फेब्रुवारी 2021 मध्ये घडली होती या गुन्ह्यातील नराधमाला सोमवारी (दि.28 फेब्रुवारी 2022) जिल्हा सत्र न्यायाधीश एस. ए. देशमुख यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे. हा प्रकार पुणे ग्रामिण पोलीस दलातील वेल्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. संजय बबन काटकर (वय-28 रा. कादवे, ता.वेल्हा) असे फाशी झालेल्या आरोपीचे नाव आहे. अशी माहिती सरकारी वकील विलास पठारे यांनी दिली.
अधिक माहिती अशी की, 15 फेब्रुवारी 2021 रोजी पुणे जिल्ह्यातील कुरण खुर्द गावात घरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले होते. वेल्हे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी मुलीचा शोध घेत होते. दरम्यान, हवेली तालुक्यालीत मालखेड थोपटेवाडी रस्त्यावरील एका पुलाखाली चिमुरडीचा मृतदेह पोलिसांना सापडला. अहवालातून चिमुरडीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यची गंभीर दखल घेत आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके तैनात केली.
आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांना हा गुन्हा संजय बबन काटकर याने केला असून तो रायगड जिल्ह्यातील नाटे येथील एका वीटभट्टीवर लपून बसल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. ग्रामीण पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध अपहरण, बलात्कार, पॉक्सो, खून यासह इतर गुन्हे दाखल केले.
या गुन्ह्यात न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर वर्षभरात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.याप्रकरणात एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आले. तसेच प्रत्यक्षदर्शी महिलेची साक्ष यामध्ये महत्त्वाची ठरली.या गुन्ह्यातील नराधमाला सोमवारी (दि.28 फेब्रुवारी) जिल्हा सत्र न्यायाधीश एस. ए. देशमुख यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे. हा प्रकार पुणे ग्रामिण पोलीस दलातील वेल्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. संजय बबन काटकर (वय-28 रा. कादवे, ता.वेल्हा) असे फाशी झालेल्या आरोपीचे नाव आहे. अशी माहिती सरकारी वकील विलास पठारे यांनी दिली.अधिक माहिती अशी की, 15 फेब्रुवारी 2021 रोजी पुणे जिल्ह्यातील कुरण खुर्द गावात घरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले होते. वेल्हे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी मुलीचा शोध घेत होते. दरम्यान, हवेली तालुक्यालीत मालखेड थोपटेवाडी रस्त्यावरील एका पुलाखाली चिमुरडीचा मृतदेह पोलिसांना सापडला. अहवालातून चिमुरडीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यची गंभीर दखल घेत आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके तैनात केली.आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांना हा गुन्हा संजय बबन काटकर याने केला असून तो रायगड जिल्ह्यातील नाटे येथील एका वीटभट्टीवर लपून बसल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. ग्रामीण पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध अपहरण, बलात्कार, पॉक्सो, खून यासह इतर गुन्हे दाखल केले.या गुन्ह्यात न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर वर्षभरात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.याप्रकरणात एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आले. तसेच प्रत्यक्षदर्शी महिलेची साक्ष यामध्ये महत्त्वाची ठरली. सदर आरोपी विरूध्द भरपुर पुरावा गोळा करताना परीस्थितीजन्य पुरावा सी.ए. रिपोर्ट , डी.एन.ए. टेस्टींग , मेडीकल ग्राऊंड व इतर पुरावे गोळा करून. न्यायालयात त्याच्याविरूध्द दोषारोपपत्र मुदतीत सादर करण्यात आले होते . सदर गुन्हयात. पोलीस अधिक्षक , पुणे ग्रामीण यांचे विनंतीनुसार सदरचा खटला. जलदगती न्यायालयात सुनावणी करीता पत्रव्यवहार केल्याने सदरचा खटला . संजय ए . देशमुख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजीनगर पुणे यांनी जलदगती न्यायालयात खटला सुरू केला व सदर आरोपीस दिनांक २८/०२/२०२२ रोजी.न्यायालयाने मरेपर्यत फाशीची शिक्षा सुनावली . सदर गुन्हयाचा तपास डॉ . अभिनव देशमुख , पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण , तात्कालीन अधिकारी विवेक पाटील , अपर पोलीस अधिक्षक व तात्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी , सई भोरे पाटील , पद्माकर घनवट , तत्कालीन पोलीस निरीक्षक स्था.गु.अ. शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सहा . पोलीस निरीक्षक मनोज पवार , वेल्हे पालीस स्टेशन यांनी तपास करून त्यांना तपसात वेल्हे पोलीस स्टेशनकडील सहा . फौज , एस . एस . बादल , सहा फौज . आर . एस . गायकवाड , पो . हवा . / १ ९ ४७ ए . एन . आडवाल , पोना . / ९ ०३ ए.पी.शिंदे , पोकॉ / ८५४ ए . आर . साळुंखे , पोकॉ / १८४ एस.आर. ओमासे , पोकॉ / २७२२ व्हि . एस . मोरे , पोकॉ / २८४३ डी . ए . जाधव यांनी मदत केली . सदर खटल्यात विलास पठारे यांनी सरकारी अभियोक्ता शिवाजीनगर पुणे म्हणुन सरकारतर्फे कामकाज पाहीले तर कोर्ट कारकुन म्हणुन पोना / २४४५ प्रसाद मांडके , व स . पो फौज विद्याधर निचित , ट्रायल मॉनिटर सेल तर केस अधिकारी म्हणुन सहा पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी कामकाज पाहीले सदर कामगिरीबद्दल. पोलीस अधीक्षक , पुणे ग्रमीण यांचेकडुन सहा पोलीस निरीक्षक मनोज पवार व त्यांच्या पथकास ३५,००० / – रूपये रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे .