पिंपरी चिंचवड,दि.२५ :- सांगवी परिसरातील एका स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर सांगवी पोलिसांनचा. छापा कृष्णा चौकाजवळ नवी सांगवी येथे ही कारवाई गुरुवारी (दि. 24) सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आली आहे.यामध्ये पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत दोन महिलांची सुटका केली आहे.
स्पा सेंटर मालक दिगंबर प्रल्हाद कदम (वय 25, रा. कृष्णा चौकाजवळ नवी सांगवी. मूळ रा. सरम, ता. हिमायतनगर, जि. नांदेड), मॅनेजर समाधान पंढरीनाथ पाटील (वय 26, रा. नवी सांगवी. मूळ रा. खलाणे, ता. सिंदखेडा, जि. धुळे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक प्रवीण पाटील यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कृष्णा चौकाजवळ नवी सांगवी येथे एका फ्लॅटमध्ये गोल्ड हेल्थ स्पा नावाने स्पा सेंटर चालू केले. त्यामध्ये आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने ठेवले आणि त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. याबाबत माहिती मिळाली असता सांगवी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी छापा मारून कारवाई केली. दोन महिलांची सुटका करून स्पा सेंटर मालक आणि मॅनेजर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये 16 हजार 830 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे तपास करीत आहेत.