कर्जत,दि.०१ : – कोरोनाच्या काळात रुग्णांना चांगली सेवा दिल्यामुळे कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांचा सन्मान पत्रकार मोतीराम शिंदे परीवाराच्या वतीने कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना कर्जत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले की या कोरोना सारख्या महाभयंकर महामारी च्या काळात कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स नर्स व त्यांच्या स्टाफने स्वतःचा जीव धोक्यात घालून चांगल्या प्रकारे रुग्णांची सेवा केली होती. व करत आहेत प्रामुख्याने या उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या साधारण व सर्वसामान्य कुटुंबातीलच असते कारण सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना खाजगी दवाखान्याचा खर्च परवडणारा नसतो. म्हणून अनेक रुग्ण कोरोनाचे असो किंवा इतर आजाराचे असो ते प्रत्येक जण कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत व चांगल्या उपचारासाठी येत असतात आणि त्यांची व्यवस्थित दखल घेऊन त्यांचे उपचार करण्याचे काम
उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्स प्रामाणिकपणे करत असतात. कोरोना काळात अनेक डॉक्टर्स व नर्स यांना कोरोना ची लागण झालेली होती तरी पण त्याला न डगमगता या डॉक्टरांनी रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे. आणि या केलेल्या सेवेबद्दल कुठेतरी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सन्मान होणे गरजेचे वाटत असल्याने येथील शिंदे परिवार यांच्या वतीने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते डॉक्टर्स व नर्स तसेच कर्मचारी यांचा हा सन्मान करण्यात आला आहे. या छोट्याशा सन्मानामुळे तुम्ही लोकांनी केलेल्या आरोग्यसेवेचे कौतुक होते असे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी म्हटले यावेळी डॉ. कुंडलिक अवसरे , डॉ. सचिन डफळ, डॉ शबीना शेख , रावसाहेब भोसले ,मुजफर सय्यद, मारोती जाधव किरण मुसळे, श्रीमती विद्याकैतके, अर्चना जाधव,
महेमुनिसा झारेकरी, मोहिनी नागरगोजे, कु. वरजेरकर शामल, सुप्रिया कांबळे, किरण समुद्र, जय छजलाने, ज्योती चावरे आदिंचा सन्मान करण्यात आला. या वेळी शिंदे परिवारातील संतोष शिंदे, गणेश शिंदे, अविनाश शिंदे, आकाश कटके, सोमनाथ शिंदे, ओंकार शिंदे, अतुल शिंदे आदी उपस्थित होते.