पुणे,दि.१२ :- पुण्यातील शिवराणा पोलिस चौकी खराडी येथे तक्रार न घेण्यासाठी 5 हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून 2 हजाराची लाच घेणार्या चंदननगर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदारास अॅन्टी करप्शनच्या पथकानं रंगेहाथ पकडलं आहे.तक्रार न घेण्यासाठी हवालदार चक्क लाचेची मागणी करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.अनिल निवृत्ती होळकर (52) असे लाच घेणार्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. होळकर हे सध्या चंदननगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी एका महिलेला 50 हजार रूपये उसने दिले होते. ते त्यांना परत मिळवून देण्यासाठी व त्या महिलेची कोणतीही तक्रार न घेण्यासाठी पोलिस हवालदार होळकर यांनी तक्रारदाराकडे 5 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 2 हजार रूपये लाच देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता पोलिस हवालदार होळकर हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले.
मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी सरकारी पंचासमक्ष होळकर यांनी तक्रारदाराकडून 2 हजार रूपयाची लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ला.प्र.वि. पुणे युनिटच्या पोलीस उप अधीक्षक विजयमाला पवार तपास करत आहेत . सदरची कारवाई. पोलीस उप आयुक्त. पोलीस अधीक्षक. राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र , अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास १. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २. ॲन्टी करप्शन ब्युरो , पुणे दुरध्वनी क्रमांक ०२० २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ – ३. व्हॉट्सअॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ ५.क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .