सांज दैनिक शक्ती झुंजार, झुंजार न्यूज चॅनेल च्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा
पुणे, दि.०६ :- मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. उपसंचालक (माहिती) डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी माहिती अधिकारी सचिन गाढवे, माहिती सहायक गणेश फुंदे, गीतांजली अवचट तसेच विलास कसबे, वैशाली रांगणेकर, सचिन
बहूलेकर, संजय गायकवाड, सुहास सत्वधर, स्वाती साळुंके, सुजित भिसे, संतोष मोरे, मोहन मोटे, सुनील झुंजार, संजय घोडके, सुमेध मनोर, पांडूरंग राक्षे, दिलीप कोकाटे, रावजी बांबळे, वर्षा कोडलिंगे, मीरा गुथालिया आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान दैनिक पुण्यनगरी दैनिक पुण्यनगरी चे उपसंपादक शिरीष कुमार रणदिवे, झुंजार न्यूज चॅनेल चे संपादक संतोष राम काळे, के.एस न्यूज चॅनेल चे संपादक विजय अव्हाळ, यांनी सदर कार्यालयास सदिच्छा भेट देऊन वरिष्ठ अधिकारी पाटोदकर, आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या