पुणे, दि.०६ :- चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या आरोपी माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्हाटेला दि ५ रोजी चतुःश्रृंगी पोलिसांनी त्यांच्या वर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात अटक केली आहे.सदरील मोक्क्याचा तपास खडकी विभागाचे सहाय्यक आयुक्त रमेश गलांडे हे करत आहेत. औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातून बर्हाटेला ताब्यात घेण्यात आले असून त्यास चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांनी माहिती दिली आहे.रवींद्र बर्हाटे याच्याविरूध्द पुणे शहरात वेगवेगळया पोलिस ठाण्यात खंडणीसह इतर गंभीर गुन्हयांची नोंद आहे. तब्बल दीड वर्ष फरार असणार्या बर्हाटेला पुणे शहर पोलिसांनी काही महिन्यांपुर्वी अटक केली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. तो औरंगाबादच्या कारागृहात होता. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्क्याच्या गुन्हयात त्याला आज ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.