मुंबई, दि.०५ :- राज्यात करोनाचा फैलाव पुन्हा एकदा वाढू लागल्याने राज्य सरकार सतर्क झालं असून पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यात आधीच निर्बंध लावले असताना रुग्णसंख्या वाढू लागल्याने करोनाला रोखण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर आहे.याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात एक महत्वाची बैठक पार पडली. सकाळी ९ वाजता तातडीने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव आणि इतर महत्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी राज्यात नेमकी काय स्थिती आहे याचा टास्क फोर्सकडून आढावा घेतला. मंत्रालयातल्या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवला जाणार आहे. त्यानतंर मुख्यमंत्री कोणते निर्बंध लावायचे यासंबंधी निर्णय़ घेणार आहेत. त्यानुसार काही कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. आज रात्री यासंबंधी नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात तूर्तास लॉकडाउन लावण्याचा विचार नाही, मात्र निर्बंध कडक केले जाण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागण्याची तयारी सुरू आहे. याबाबत नुकतंच आज सकाळी राज्य सरकारची टास्क फोर्स बरोबर बैठक संपली आहे. आज रात्रीपासून राज्यात नवी नियमावली जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
आज (बुधवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात तातडीची बैठक बोलवली. या बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे हे घेतलेले निर्णय रात्री जाहीर होण्याची शक्यता आहे. तुर्तास राज्यात लाॅकडाऊन नाही मात्र कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तर, राज्यातील सरकारी कर्मचार्यांच्या उपस्थिती 50 ते 75 टक्क्यांवर आणली जाण्याची शक्यता आहे. शक्य असेल त्या खासगी कार्यालयात वर्क फ्रॉम होम लागू करण्याची शक्यता आहे. दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा कमी केल्या होणार असल्याची चर्चा आहे. अशा आदी गोष्टीवर विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, सध्या राज्यात संध्याकाळी 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी आहे. परंतु सध्या राज्यात वाढणा-या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता राज्यात रात्रीपासून कशा पद्धतीचे नियम लागू होणार? याकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष आहे.