पणे, दि२२ :-पुणे शहरातील भाईगिरी करणाऱ्या रेकॉर्ड वरील गुन्हेगाराला पुणे शहर पोलीस आयुक्तांचा दणका, लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील एका भाईला एक वर्ष स्थानबद्ध करण्यात आले. पुणे पोलीस आयुक्तांनी हा आदेश काढला.आकाश माने ( वय 22, रा केसनंद, ता हवेली ) असे या गुन्हेगारांचे नाव आहे. तो समाजात भाईगिरी करून दहशद निर्माण करीत होता. यामुळे नागरिक दडपणाखाली वावरत होते. कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत असल्याने लोणीकंद पोलीसानी त्याची गुन्ह्यांची कुंडली काढून स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना दिला.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले. त्याला औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले. परिमंडळ चारचे उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे, सहायक पोलिस निरीक्षक निखिल पवार, उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे,. उपनिरीक्षक सुरज गोरे, बाळासाहेब सकाटे, प्रशांत कापूरे, सागर कडू, कैलास साळूंके, प्रशांत करनावर, विनायक साळवे, अजित फरांदे यांनी ही कामगिरी केली.