पुणे,दि.२१:- महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने (GST) 200 कोटीपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी पुण्यातील एका व्यापाऱ्यास अटक केली आहे. या व्यापा-याने 233 कोटींची खोटी बिले दिल्याचे उघडकीस आले आहे अशी माहिती राज्य कर अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.आफताफ मुमताज रेहमानी असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांविरोधात कार्यवाही करण्यात येते. आफताफ रेहमानी याच्या मे. अर्श स्टील कॉर्पोरेशन या कंपनीने वस्तू व सेवाकर कायदा 2017 याअंतर्गत नोंदणी दाखला घेतला.
या कंपनीच्या माध्यमातून रेहमानी याने 200 कोटी रकमेची फक्त बिले देऊन 41 कोटी 95 लाखांचा आय. टी. सी. (इनपुट टॅक्स क्रेडिट) पुढील खरेदीदारांना पाठवला. त्याचप्रमाणे हा कर भरायला लागू नये यासाठी बोगस कंपनीकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय दाखवलेल्या बोगस खरेदी देयकातून सुमारे 27 कोटी 7 लाख रकमेचा परतावा प्राप्त करून घेतला.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य वस्तू व सेवाकर विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली