पुणे,दि१८ :- पुण्यात पुन्हा गुंडाचा उच्छाद पहायला मिळाला आहे.बिबवेवाडीत रात्रीच्या सुमारास धुडगूस घालत वाहनांची तोडफोड करणाऱ्या या टोळीला अवघ्या काही तासांतच पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे.खुनाचा प्रयत्न करून वाहनांची तोडफोड करणारी दहशत माजवणारी टोळी 12 तासाचे आत बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन गजाआड केली. ही घटना बिबवेवाडी पोलीस स्टेशन परिसरात घडल्याची माहिती समोर आली आहे. काकडे वस्ती येथे राहणारा अमिर खान तसेच शेळकेवस्तीत राहणारा सुरज कोळी आणि अकाश कोळी यांचे एप्रिल 2021 पासून पूर्ववैमनस्यावरून वाद सुरु होते. 13 डिसेंबर रोजी अमिर खानचा वाढदिवस होता.वाढदिवस साजरा करत असताना शेळके वस्तीतील सुरज कोळी आणि त्याचे साथिदार हे अमिर खानला मारण्यासाठी गेले. यावेळी अमिर खान आणि त्याचे मित्र तेथून पळून गेले. त्यानंतर 13 डिसेंबरच्या रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास अमिर खान हा त्याचे मित्र हत्यारे घेऊन सुरज कोळी आणि त्याच्या टीमला मारण्यासाठी शेळके वस्तीत शिरलेया टोळक्याने 2 ऑटो रिक्षा 4 पेगो, 1 टेम्पो यांच्या काचा कोयत्याने, तलवारीने फोडल्या. तसेच 1 कॅलिबर मोटार सायकल आणि 1 मोपेड गाडीच्याच्या पेट्रोल टाकीवर कोयते, तलवारीने मारून मोठ-मोठ्याने आरडाओरडा करून दहशत माजवली. त्याचप्रमाणे वस्तीत राहणाऱ्या नागरिकांवर सुद्धा त्यांनी हल्ला केला. घडलेल्या प्रकाराची तक्रार तेथील नागरिकांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात केली.रोहित नरसिंग राठोड, अरबाज अहमद पटेल, सुरेंद्र गोपाल लाबीछने, रोहन राजेंद्र जगताप, सोनु अनिल खंदारे, अर्जुन ऊर्फ शैलेश अमोघसिद माळू असे आरोपींची नावे आहेत. बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होताच बिबवेवाडी पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व आरोपींना 12 तासाच्या आत हत्यारांसह अटक करण्यात आली आहे.