श्रीगोंदा,दि.१७ :- सहकार महर्षी नागवडे कारखाना निवडणूकिच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर २१ जागेसाठी ३०४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.त्यासाठी उमेदवारी अर्ज विक्री ५०४ झाले आहेत.कारखाना निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले.
तालुक्यातील मागील पाच वर्षाचा निवडणूकींचा इतिहास पाहता सोधा पक्ष,तडजोडी, नोकरीचे वेगवेगळी आश्वासन देऊन, गावपातळीवर पदांचे आश्वासन,एकमेकांच्या सोयीचे उमेदवार देऊन निवडणूका सत्ताधार्यांनी जिकल्या आहेत.त्याचा परिणाम निष्ठावंत कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय झाला आहे.नेत्यांच्या तडजोडीमुळे जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची प्रापंचिक,आर्थिक, मानसिक हानी झाली आहे.त्यामुळे कित्येक कार्यकर्त्यांनी अलिप्त भूमिका घेतली आहे.
सहकाराच्या माध्यमातून नेत्यांनी अनेक खासगी कंपन्या उभा करून माया गोळा केली आहे.त्याचा परिणाम म्हणून सहकारात निवडून जिकल्यानंतर समाजात मान-सम्मान वाढतो आर्थिक सुबत्ता येते आणि स्थानिक पातळीवर निवडणूका पार पाडण्यासाठी त्या पदाचा उपयोग होतो.अशी सभासदांच्यात भावना निर्माण झाली म्हणून आजपर्यत विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत.त्यामुळे धक्कादायक निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.उमेदवारी अर्ज दाखल करणारे सभासद अर्ज मागे घेण्याच्या मनस्थितीत नाही तरीही छाननी वेळी किती अर्ज अवैध होतील हे पाहावे लागेल.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे