पुणे, दि१६:-तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार करून सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठ्याने चार हजारांची लाच घेतली. याप्रकरणी आंबेगाव तालुक्यातील सजा पेठच्या तलाठ्याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हेमंत दिलीप भागवत (वय 40) असे गुन्हा दाखल झालेल्या तलाठ्याने नाव आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2 नोव्हेंबर रोजी पडताळणी केली होती. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने पेठ येथे जमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीचा फेरफार करून सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी तलाठी हेमंत भागवत याने सहा हजारांची लाच मागितली. त्यानंतर तडजोड करून चार हजार रुपये तक्रारदाराकडून लाच घेतली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत तलाठी भागवत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
. ला.प्र.वि. पुणे युनिटच्या पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करत आहेत . सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र , अपर पोलीस अधीक्षक. सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे.सुहास नाडगौडा , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास क्रमांक हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४, २. अॅन्टी करप्शन ब्युरो , पुणे दुरध्वनी क्रमांक – ०२०- २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ – ३. व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ ५. ई – मेलआयडी पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे