श्रीगोंदे,दि१६ :- श्रीगोंदे तालुका खादी ग्रामउद्योग संघाच्या अध्यक्ष पदी सौ संध्या विनायक ससाणे तर उपाध्यक्ष पदी संजय शिंदे यांची निवड झाली ,अध्यक्ष पदाची निवड अतिशय अटीतटीची झाली तर उपाध्यक्ष शिंदे हे बिनविरोध झाले असून या मध्ये बापू कसबे यांचा दारुण पराभव केला, या मध्ये बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहटा यांनी विशेष लक्ष घातले होते .
श्रीगोंदे तालुका खादी ग्रामउद्योग संघात ११ संचालक निवडून आले आहेत. त्यामध्ये अध्यक्ष शुभम घाडगे यांनी ठरल्याप्रमाणे एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी एक महिन्यांपूर्वीच पक्ष श्रेठी बाळासाहेब नाहटा यांच्याकडे राजीनामा दिला होता,त्यामुळे आज नवीन झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडी मध्ये सौ संध्या ससाणे व बापू कसबे यांच्या मध्ये सरळ लढत झाली.यामध्ये ससाणे यांना ६ मते मिळाली तर कसबे यांना ४ मते मिळाली व रज्जाक शेख हे संचालक गैरहजर राहिले. तसेच उपाध्यक्ष पदी संजय शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली . ससाणे व शिंदे यांच्या निवडीनंतर नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे ,बाळासाहेब नाहटा,नानासाहेब ससाणे,माजी अध्यक्ष अंकुश शिंदे,भगवानराव गोरखे , वसंतराव सकट ,विनायक ससाणे ,मनोज घाडगे ,राजू ससाणे यांनी अभिनंदन केले.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे