श्रीगोंदा,दि.१५ :- नागवडे सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून श्रीगोंदा गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी जुन्या व नव्या सभासद कार्यकर्त्यांनी गुढग्याला बाशिंग बांधले आहेत. त्यामुळे मोर्चे बांधणीला सुरवात झाली असून नागवडे गटात उमेदवारी मिळावी म्हणून सभासद कार्यकर्त्यांनी देव पाण्यात ठेवायला सुरवात केली आहे.
नागवडे गटातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रमोद शिंदे व विद्यमान संचालक यांच्यात रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसत आहेत.जर कारखाना निवडणुकीत श्रीगोंदा गटात विद्यमान संचालक यांना उमेदवारी मिळाली तर कारखाना निवडणुकीत याचा विपरीत परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहे?असे सभासद वर्गातून बोलले जात आहे.
यावेळी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रमोद नामदेव शिंदे यांनी नागवडे गटातून उमेदवारी अर्ज दाखल करावा अशी मागणी मढेवडगांव, बाबूर्डी, म्हातारपिंप्री या गावातील सभासद वर्गातून होत असल्याने नागवडे गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रमोद शिंदे हे प्रयत्नशील राहणार आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील असणारे प्रमोद नामदेव शिंदे हे राजकारणात नेहमीच सक्रिय असतात.
नगर जिल्ह्यातील दक्षिणेतील नागवडे सहकारी कारखान्याची निवडणूक ही नेहमीच प्रतिष्ठेची अन चर्चेची अन अत्यंत चुरशीची निवडणूक होत असते. परंतु सत्ताधारी नागवडे हे श्रीगोंदा गटातील उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार अशी चर्चा सभासद वर्गातून होत आहे
.श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे