पुणे, दि ०६ :- पुण्यातील कात्रज परिसरात गोळीबारची आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारा हि घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एका तरूणावर गोळीबार केला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोहित वडेवाले जवळील चंद्रभागा वाईन्सच्या समोर ही घटना घडली आहे.सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलिस चौकीपासुन अगदी हकेच्या अंतरावर हा गोळीबार झाला आहे. तरूणावर बेछुट गोळीबार झाल्याने तरूण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळी पाहणी केली आसुन गोळीबार कशामुळं झाला हे अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, ‘समीर मनूर शेख’ नाव असलेल्यावर बेछुट गोळीबार झाला आहे अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, पोलिस अधिकारी घटनास्थळी आसुन असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही मिळतंय काय हे तपासण्याचे काम सुरू आहे. नेमके किती राऊंड फायर झालेत हे सांगता येत नसलं तरी बेछुट गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दुपारी 12 वाजता या घटनेची खबर प्राप्त झाली आहे.
दरम्यान, गोळीबारामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या समीर मनूर याचा जागीच मृत्यू झाला आहे अशी माहिती समोर येत आहे.