कर्जत,दि०२:- पुणे शहरातील पुणे दगडूशेठ गणपती मंदिर परिसरातील पार्किंग मध्ये लावलेली मोटरसायकल चोरली होती व दिनांक 30 /11/ 2021 रोजी कर्जत पोलिसांना यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की इसम नामे विजय महादेव हुलगुंडे हा चोरीची मोटरसायकल वापरत आहे अशी बातमी मिळाल्याने कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ सापळा लावून सदर इसमास ताब्यात घेण्याच्या सूचना देऊन पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार पाठविले असता सदर इसम हा टाकली खांडेश्वरी येथे असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी विजय महादेव हुलगुंडे यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असता त्याचे ताब्यात एक काळे लाल रंगाची पल्सर गाडी मिळून आली सदर गाडी बाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरची मोटरसायकल ही पुणे दगडूशेठ गणपती मंदिर परिसरातील पार्किंग मध्ये लावलेली चोरली असलेबाबत सांगितले आहे, विजय महादेव हुलगुंडे राहणार काटेवाडी तालुका जामखेड याच्याविरुद्ध कर्जत पोलिस स्टेशनला चोरीचे वाहन बालगल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस अमलदार जितेंद्र सरोदे हे करत आहेत .सदरची कारवाई.पोलीस अधिक्षकसो.मनोज पाटील अहमदनगर जिल्हा , अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल , उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव , सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित , पोलीस अंमलदार ,, पांडुरंग भांडवलकर श्याम जाधव , सुनिल खैरे ,गोवर्धन कदम, यांनी केली आहे .