पुणे, दि.०२ :- पुण्यातील कोंढवा परिसरात दहशत निर्माण करुन खुनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे असे गुन्हे करणार्या मंगेश माने व त्यांच्या टोळीतील इतर ५ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. मंगेश अनिल माने (वय 26, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), लाडप्पा ऊर्फ अखिलेश ऊर्फ लाड्या चंद्रकांत कलशेट्टी (वय 20, रा. गोकुळनगर, कोंढवा बुद्रुक), सुरज अंकुश बोकडे (वय 22, रा. माऊलीनगर, कोंढवा), सागर कृष्णा जाधव (रा. सासवड व अप्पर बिबवेवाडी), प्रथमेश रमेश हनाळनंदे (रा. टिळेकरनगर, कोंढवा), प्रतिक रमेश हनाळनंदे (रा. टिळेकरनगर, कोंढवा) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.मंगेश माने व त्यांच्या टोळीवर कोंढवा पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे 10 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधकात्मक कारवाई केल्यानंतरही त्यांनी पुन्हा गुन्हे केले आहे. त्यांची कोंढवा, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरात दहशत आहे. ते लोकांना दमदाटी करणे, खुनाचा प्रयत्न , जबर दुखापत करणे, प्राणघातक हत्यार विना परवाना जवळ बाळगणे, खंडणी मागणे अशा प्रकारचे गुन्हे करीत असतात.कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे व पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्फत मोक्का कारवाईचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविला होता.
त्यांनी या प्रस्तावाची छाननी करुन त्याला मंजुरी दिली. आहे. व नमुद आरोपी विरुध्द मकोका प्रमाणे पुढील कारवाई केली आहे . सदरची कामगीरी पोलीस आयुक्त , पुणे शहर , अमिताभ गुप्ता , पोलीस , सह आयुक्त , पुणे शहर डॉ . रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर , नामदेव चव्हाण , पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -५ पुणे शहर श्रीमती नम्रता पाटील , पोलीस आयुक्त , वानवडी विभाग पुणे ,राजेंद्र गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ,सरदार पाटील , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , जगन्नाथ जानकर पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) , पुणे शहर , गोकुळ राऊत , स्वराज पाटील , सहा . पोलीस निरीक्षक , अनिल सुरवसे , सहा . पोलीस निरीक्षक , सर्व्हेलन्स पथकातील अंमलदार पो.हवा. जगदिश पाटील , पो.हवा . राजेंद्र ननावरे , पोलीस अंमलदार जगदिश पाटील व पोलीस अंमलदार रूपनवर यांनी केली आहे.पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहराचा कार्यभार हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष ठेवले असुन गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर अधिक भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देणेत आलेले आहेत . त्यांचे मार्गदर्शनाखाली मागील ०१ वर्षापासुन मकोका कायदया अंतर्गत झालेली ही ६२ वी कारवाई आहे .