पुणे, दि.३०:-वारजे व उत्तमनगर परिसरात दहशत पसरविणाऱ्या व बदला घेण्यासाठी गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्या निलेश गायकवाड याच्यासह त्याच्या टोळीतील ११ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गेल्या १ वर्षात केलेली ही ६१ वी ‘मोक्का’ कारवाई आहे.निलेश विजय गायकवाड (रा. रामनगर, वारजे), अक्षय रवींद्र खवळे, ऋतिक कैलास एखंडे (रा. म्हात्रे पुलाजवळ), विकी ऊर्फ हेमंत धर्मा काळे (रा. रामनगर, वारजे), मोन्या ऊर्फ रामेश्वर सुभाष मोरे, कार्तिक संजय इंगवले (वय १८), अनिरुद्ध ऊर्फ बाळा राजू जाधव (वय २४, रा. रावेत गाव), अरविंद मारुती माडकर (वय ३०, रा. रामनगर, वारजे), अक्षय ऊर्फ अवधुत महेश यादव (वय २७), संकेत राजेंद्र ढेणे (वय २३, रा. वारजे), विकास कैलास गव्हाड (वय २०, रा. सहयोगनगर, वारजे) अशी ‘मोक्का’ कारवाई झालेल्या गुंडांची नावे आहेत.निलेश गायकवाड टोळीने वारजे, उत्तमनगर परिसरातील आपल्या टोळीची दहशत निर्माण केली होती.व त्यांनी खुन, खुनाचा प्रयत्न, शस्त्रे बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करुन दहशत निर्माण केली होती.केदार भालशंकर हा मोटारीने जात असताना ८ ऑगस्ट रोजी शिवणे स्मशानभूमी ते एनडीए रोड दरम्यान पाठलाग करुन निलेश गायकवाड व त्याच्या साथीदारांनी गोळीबार करुन त्याला जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. राजेंद्र डहाळे यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन मोक्का कारवाईला मंजुरी दिली. सदरची कामगीरी पोलीस आयुक्त, अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त पुणे शहर डॉ रविंद्र शिसवे , राजेंद्र डहाळे , अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग , पुणे पोलीस उप आयुक्त सो परी ०३ श्रीमती पौर्णिमा गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल जैतापुरकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , उत्तमनगर पो.स्टे . अर्जुन बोत्रे पो.नि. गुन्हे , सपोनि उमेश रोकडे , सपाफौ वायदंडे , पो.ना.वारुळे . पो ना महेश गवारी , पो.ना. हजारे , पो . शि . समीर पवार , पो.शि. खाडे यांनी केलेली असुन सदर गुन्हयाचा तपास सहा पोलीस आयुक्त कोथरुड विभाग , गजानन टोम्पे हे करीत आहेत.पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहराचा कार्यभार हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष ठेवले असुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर अधिक भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देणेत आलेले आहेत . त्यांचे मार्गदर्शनाखाली मागील ०१ वर्षापासुन मकोका कायदया अंतर्गत झालेली ही ६१ वी कारवाई आहे .