पुणे, दि.२७:- वारजे माळवाडी येथील अमर ब्रिजजवळ असलेल्या झोपडपट्टीत. पहाटे हा गोळीबार झाला होता,या गोळीबारात अमर चव्हाण असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. व हल्लेखोर पसार झाले होते.व अमर हे ब्रिजजवळ असलेल्या झोपडपट्टी परिसरात राहतात. दरम्यान ते पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घरातून लघुशंका करण्यासाठी बाहेर आले होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. यात एक गोळी त्यांना लागली होती, त्यात ते जखमी झाले आहेत व फियादी अमर रमेश चव्हाण , वय ३४ वर्षे रा हायवे ब्रिजशेजारी वारजे माळवाडी पुणे याचेवरतीन अनोळखी इसमांनी मोटार सायकल वर येवुन बंदुकीने फायरिंग केली व फिर्यादीला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने वारजे माळवाडी पोलीस ठाणे गुन्हा दाखल आहे . व दाखल गुन्हयाचा तपास वारजे माळवाडी पोलीस स्टेशन व खंडणीविरोधी पथक ९ , गुन्हे शाखा पुणे शहर असे संयुक्त रित्या तपास करीत होते .व जखमीचा भाऊ निलेश चव्हाण व मित्र गौरव बिरुंगीकर यांचेकडे सखोल चौकशी केली असता पोलिसांना असे निष्पन्न झाले आहे की , जखमी इसम अमर चव्हाण यांस त्याचा मित्र गौरव बिरुंगी करहा अवैद्यरित्या मिळवलेला देशी बनावटीचे पिस्टल हाताळण्याचे कसब दाखवित असताना त्यातुन उडालेली गोळी ही जखमी इसम याचे पोटात डाव्या बरगडीच्या खाली घुसुन तो गंभीर जखमी झालेला होता . देशी बनावटीचे पिस्टल संयुक्त पोलिस पथकाने ताब्यात घेतले असुन गौरव सुरेश बिरुंगीकर वय २५ वर्षे व जखमीचा भाऊ निलेश रमेश चव्हाण वय २८ वर्षे याचे कडे अधिक तपास करीत . सदरची कामगीरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता पोलिस सह आयुक्त , पुणे शहर डॉ . रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे शाखा पुणे शहर , रामनाथ पोकळे , अप्पर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशिक विभाग , पुणे शहर . राजेंद्र डहाळे , पोलीस उप – आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर श्रीनिवास घाडगे , पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ – २ ( अतिरिक्तकार्यभार परिमंडळ -०३ ) , पुणे शहर सागर पाटील , सहायक पोलीस आयुक्त , गुन्हे शाखा पुणे शहर.लक्ष्मण बोराटे , सहा . पोलीस आयुक्त , कोथरूड विभाग , पुणे शहर. गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली विनायक वेताळ , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , खंडणी विरोधी पथक -१ , गुन्हे शाखा पुणे शहर वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) . अमृत मराठे , सहा पोलीस निरक्षक संदिप बुवा खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा पुणे शहर , वारजे माळवाडी पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे पोउपनि नरेंद्र मुंढे , पोउपनि बागल खंडणी विरोधी पथका १ गुन्हे शाखेचे अंमलदार सपोफौ पाडुरंग वांजळे , पोना विजय कांबळे , पोना राजेंद्र लांडगे , पोना विवेक जाधव , पोना नितीन रावळ , पोना अमोल आवाड , पोना प्रफुल्ल चव्हाण , पोशि हनुमंत कांदेव तपास पथकाचे अंमलदार पोना आण्णा काटकर , पोनाअमोल राऊत , पोना गोविंद फड , पोना सचिन कुदळे , पोना अमोल भिसे , पोशि विजय भुरुक , पोशि नितीन कातुर्डे , पोशि रमेश चव्हाण , पोशि अजय कामठे , पोशि बाळासाहेब शिरसाठ , पोशि गोविंद कपाटे , पोशि ज्ञानेश्वर गुजर यांनी केली आहे .