पुणे दि.27: पिंपरी वाघिरे येथे पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) जानेवारी 2021 ऑनलाईन सोडतीमध्ये पात्र लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरुपात त्यांच्या घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले.यावेळी आमदार अण्णा बनसोडे, नगरसेवक, झोपडपट्टी
पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, म्हाडाचे कार्यकारी अभियंता अनंत खेडकर, खासगी प्रॉपर्टी समूहाचे प्रतिनिधी प्रमोद पवार, नितीन कदम उपस्थित होते.म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी म्हाडाच्या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला सदनिकाधारक नागरिक, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.