पुणे,दि२७ :- पुणे येथील प्रभाग रचना पूर्ण करू शकत नाही असे प्रशासनाकडून सांगविणे ,हे निवडणुका पुढे ढकलण्यासाठी अधिकाऱ्यांच्या मदतीने रचलेले राजकीय षड्यंत्र असून त्यास राज्य निवडणूक आयोगाने बळी पडू नये असे आवाहन पुणे महापालिकेतील माजी विपक्ष्नेते उज्वल केसकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केले आहे.या पत्रात केसकर यांनी असे म्हटले आहे कि,’निवडणूक आयोग हि राज्यघटनेच्या ‘243k’ या कलमाद्वारे ‘महानगरपालिका’ नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका घेण्यासाठी प्राधिकृत संस्था आहे.व पुणे महानगरपालिका विहित मुदतीत म्हणजे 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रभाग रचना पूर्ण करू शकत नाही असे कारण देऊन पंधरा दिवसाची मुदत मागितली आहे असे वृत्त पसरविले आहे , खरं म्हणजे हे एक राजकीय षड्यंत्र आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्ताधाऱ्यांना सध्याचे वातावरण निवडणुकीसाठी अनुकूल नाही म्हणून निवडणूक पुढे ढकलण्यासाठी ही केलेली एक चाल आहे असे आमचे म्हणणे आहे वास्तविक आपण दिलेल्या सूचनेचा नीट अभ्यास केल्यास पुणे महानगरपालिकेकडे असलेले अद्ययावत तंत्रज्ञान तंत्रज्ञ याचा विचार केला असता, हे काम विहित दिवसांमध्ये पूर्ण होऊ शकते असे असताना आम्हाला हे काम विहित मुदतीत पूर्ण करता येणार नाही असे सांगणे म्हणजे कुठेतरी राजकीय दबाव आहे असे स्पष्ट होते.
आम्ही घेतलेल्या माहितीनुसार महा विकास आघाडीतील घटक पक्ष ‘एकत्र न येता’ प्रत्येक जण आपल्याला सोयीची कुठली ‘प्रभाग’ रचना आहे त्याचे ‘नकाशे’ बनवून ते अधिकाऱ्यांना देत आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कसे बसवायचे असा संभ्रम या अधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे असे कळते एक पक्ष ज्यांच्याकडे पालक मंत्री पद आहे दुसरा पक्ष ज्यांच्याकडे नगर विकास खाते आहे आणि तिसरा पक्ष आमच्या पाठिंब्यामुळेच हे सरकार आहे असे सांगतात त्यामुळे नेमकं कुणाचं ऐकायचं असा प्रश्न महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पडला आहे आणि म्हणून यातून मार्ग काढण्यासाठी मुदतवाढ मागून घ्यायची आणि कुणाचाच वाईटपणा घ्यायचा नाही असे त्यांचे धोरण दिसते.