जालना ,दि २० :- अंबड ते शिर्डी पायीदिंडी सोहळ्याच्या वतीने श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट च्या मनमानी नियमबाह्य कामकाजाबाबत चालु असलेल्या उपोषणास जाहीर पाठींबा द्वारका माई चा दक्षिण दरवाजा खुला करणे-साईट्रस्टचे साई प्रसादालय भोजनगृह सुरु करणे -संपुर्ण दर्शन आॅफलाईन सुरु करावे-साईट्स्टचे दोनशे रुम गार्डन सुरु करावे-गेट नंबर तीन मधुन साईभक्ताना दर्शनास आत जाऊ व बाहेर येऊ द्यावे- साईट्रस्टने जागोजागी सार्वजनिक रस्ते अडवून नियमबाह्य लावलेले लोखंडी बॅरीकेटेस काढुन रस्ते भक्तसाठी खुले करावे..आदी मागण्यासाठी उपोषणास बसलेले आहेत.साई बाबांच्या मानस आई बायजाबाई यांचे वंशज श्री दिगांबर कोते पाटील व शिर्डी ग्रामस्थ यांनी 18 नोव्हेंबर पासुन सुरु केलेल्या उपोषणास अंबड ते शिर्डी पायीदिडी सोहळ्याचे वतीने दिंडीचे आयोजक साईभक्त संदीप पाटील आरगडे व साईभक्त गोपी घायाळ तसेच कैलास सपकाळ, कल्याण देवडे, राम लहाने ,देवा कानडे,आग्नेय सुरंगे,जय आरगडे,महेश चोथे, करण पटेकर व आदी.यांनी शिर्डी येथे साई दिंडी गेली असता जाहीर पाठींबा दिला…
तसेच साईबाबांच्या मानस आई बायजाबाई यांचे वंशज श्री दिगांबर कोते पाटील व शिर्डी ग्रामस्थ यांना उपोषणास बसावे लागते याबद्दल अंबड ते शिर्डी पायीदिंडी सोहळ्याचेे आयोजक संदीप पाटील आरगडे व गोपी घायाळ यांनी तीव्र निषेध करुन असमाधान व्यक्त केले
जालना प्रतिनिधी :- भागवत गावंडे