पुणे दिली १८:- शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाचे बीले (एफ.आर.पी.) मिळण्यासाठी गेल्या चार दिवसापासून पुण्यातील साखर संकुलासमोर सुरु असलेले माजलगाव तालुक्यातील पीडीत शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनामुळे लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव (जि.बीड) आणि छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव (जि.बीड) च्या प्रशासनाने खडबडून जागे होवून ऊस बीलाची रक्कम संबंधितांच्या बॅक खात्यावर जमा केली असली तरी जय महेश साखर कारखाना मात्र वेळ काढू धोरण अवलंबित असल्यामुळे आंदोलक तीव्र संताप्त झाले आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखाना पवारवाडी, छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव आणि लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव यांनी २०१८-१९ गळीत हंगामामध्ये गाळप केलेल्या ऊसाला १५ दिवसाच्या आत पैसे मिळावेत अफा कायदा असताना साखरसम्राट या कायद्याला धाब्यावर बसवून तब्बल तीन-तीन महिने ऊसाचे पैसे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देत नाहीत म्हणून शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे मराठवाडा संपर्क नेते खासदार चंद्रकांत खैरे, बीड जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगाव शिवसेना तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १५ जानेवारी पासून साखर आयुक्त कार्यालयासमोर अनोखे रसवंती आंदोलन सुरु केले आहे तरीही या आंदोलनाच्या रेट्याने सावरगाव आणि तेलगाव येथील कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर टाकले आहेत. मात्र गेड्यांची कातडी पांघरुन झोपेचे सोंग घेतलेल्या जय महेश साखर कारखाना पवारवाडी प्रशासनाला जागे करण्यासाठी दिनांक १८ जानेवारी रोजी साखर संकुलासमोर जागरण गोंधळ आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला उत्फुर्त असा प्रतिसाद मिळत असून या आंदोलनात माजी उपनगराध्यक्ष तुकाराम येवले, जिल्हा संघटक रामदास ढगे, अॅड.दत्ता रांजवण, अनिल धुमाळ, विक्रम सोळंके, आकाश खामकर, ओंकार जाधव, दयानंद शिंदे, नामदेव सोजे, तिर्थराज पांचाळ, हनुमान सरवदे, सुखदेव धुमाळ, महेश खेटे, गजानन गिराम, महादेव सुरवसे, गणेश शिंदे, शिवाजी सावंत, जयराम राऊत, नाना बापमारे, गोविंद काळे, करण थोरात आदींसह शेतकरी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.
दरम्यान चौथ्याही दिवशी मोठ्या प्रतिसादात पुण्यातील साखर संकुलसमोर सुरु असलेल्या अभिनव आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. रसवंती आंदोलनानंतर जागरण गोंधळ आंदोलनाला उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दोन साखर कारखान्यांनी समन्वयाची भूमिका घेतली असली तरी जय महेश साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्येकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. जय महेश साखर कारखान्याने अशीच मनमानी सुरु ठेवली तर पुढील काळात घडणाऱ्या अनुचित प्रकाराला संबंधित कारखाना प्रशासन आणि राज्य सरकारच जबाबदार असेल असे आंदोलकांनी बोलताना सांगितले.