पुणे, दि. १६:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध वास्तूंचे उद्घाटन सोहळा दिनांक १७ रोजी सायंकाळी ५ वा. संपन्न होत आहे. पुणे विश्रांतवाडी येथील सर्वे नंबर १०४/१०५ येरवडा येथील सुमारे २३ एकर परिसरात साकारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन तसेच १ हजार क्षमता असलेल्यास शासकीय वस्तीगृहाच्याा इमारतीचे उद्घाटन केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री, भारत सरकार प्रकाश जावडेकर, यांच्या हस्ते तर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली व पुण्याचे पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री, गिरीश बापट यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. सदर कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री, दिलीप कांबळे, जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर श्रीमती मुक्ताा टिळक यांच्यासह अनेक यांच्यासह खा. श्रीमती वंदना चव्हाण, अमर साबळे, संजय काकडे, अनिल शिरोळे, आ. शरद रणपिसे, आ. श्रीमती नीलम ताई गोरे, आ. अनंत घाडगे, आ. अनिल भोसले, आ. श्रीमती माधुरी मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. विजय काळे, आ. मेधाताई कुलकर्णी, आ. योगेश टिळेकर, आ. जगदीश मुळीक, आ. गौतम चाबुकस्वार, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, दिनेश वाघमारे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, मिलिंद शंभरकर, आयुक्त समाज कल्याण, पुणे व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असल्याचचे प्रादेशिक उपायुक्तर, अविनाश देवसटवार, कार्यकारी अभियंता श्रीकांत बागुल, सहाय्यक आयुक्ते, समाज कल्यािण विजयकुमार गायकवाड यांनी कळविले आहे.