श्रीगोंदा,दि १०:- :-मी माळी समाजाचा असल्याने मी कारखान्याच्या कारभारावर स्पष्ट बोलतो दोन वर्षांपूर्वी राजीनामा देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करत मी मिटिंग ला उपस्थित राहत नसल्याचा ठपका ठेवत कोर्टात याचिका दाखल करून मला कारखाना संचालक पदावरून काढणाऱ्या नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे आमदारकी चे स्वप्न पाहत आहेत,पण केवळ मी माळी समाजाचा असल्याने जर मला संचालक पदावरून हटवले.तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखाना निवडणूक उंबरठ्यावर येऊन पोहचली असताना आरोप प्रत्यारोप चालू झाले आहेत. यावेळच्या निवडणुकीत काय घडणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.नागवडे कारखाना कायम निवडणुकीच्या रंगात रंगला एकमेकांवरील टीकेने गाजतो. एकमेकांना डिवचल्याशिवाय निवडणुक पूर्णच होत नाही. हा इतिहास आहे.पत्रकार परिषदेत जि.प.मा.अध्यक्ष आण्णासाहेब शेलार बोलताना म्हणाले कि, ज्या सभासदांनी कारखाना उभारणीमध्ये स्वतःच्या जमिनी विकल्या,बायकांचे दागिने मोडून मोलाची साथ दिली होती.अशा १९५५४ सभासदांपैकी १०१५४ सभासदांना वंचित व अपात्र करण्याचे डाव केले होते.परंतु ते धुडकावून लावण्याचे काम शेतकरी आघाडी सहकार बचाव पॅनलचे प्रमुख केशव(भाऊ) मगर,आण्णासाहेब शेलार,जिजाबापू शिंदे, काकडे वकिल यांनी न्यायालयीन लढाई करून मतदानास पात्र केले हया गोष्टीची जाणीव सभासदांनी ठेवावी.तसेच स्वताः बापूच्या बरोबर कारखाना उभारणी मध्ये सिंहाचा वाटा असणारे एकनाथ निंबाळकर, खासेराव (काका)वाबळे , बाबूराव तनपुरे,आबासो लगड,रंगनाथ (बाबा) पंधरकर, शिवराम आण्णा पाचपुते यांच्या कुटुंबातील सदस्यांचा ७ तारखेच्या कार्यक्रमात सत्कार करणे गरजेचे होते व बापूच्या स्मारकास्थळी साधी प्रतिमा सुध्दा लावण्याचे औदर्य दाखवले नाही.नागवडे कारखान्याचे व्हा.चेअरमन केशव (भाऊ) मगर बोलताना म्हणाले की,बापूचे निधन झाल्यावर बापूच्या नावाने हॉस्पीटल काढायचे आहे.यासाठी शिक्षक संस्थेतील सर्व कामगार व शिक्षक यांचा पगार मिळून सुमारे ३ कोटी ५० लाख रूपये गोळा केले ही रक्कम कुठे गेली.तसेच बापूच्या स्मारकाच्या उदघाटन प्रसंगी दलित समाजाच्या सभापती गिंताजली पाडळे, काँग्रेस पक्षाचे ता.अध्यक्ष दिपकराव भासेले, राष्ट्रवादीचे ता.अध्यक्ष हरिदास (आबा) शिर्के, शिवसनेचे बाळासाहेब दुतारे याच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीचे नावे टाकायला कमीपणा का वाटला असा सवाल देखील यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.त्यानंतर पं.समिती सदस्य जिजाबापू शिंदे म्हणाले,बापूच्या स्मारकाच्या कार्यक्रमामध्ये सर्व नातेवाईकाची मायदळी व प्रमुख कार्यकर्ते,नेते पायदळी अशी अवस्था झाली होती त्याचा शेतकरी व सभासदांच्या वतीने जाहीर निषेध करतो.
या पत्रकार परिषदेत कारखान्याचे व्हा.चेअरमन केशव(भाऊ) मगर,जि.प.मा.अध्यक्ष आण्णासाहेब शेलार,पं.स.सदस्य जिजाबापू शिंदे, काकडे वकिल,संदीप नागवडे(सर),वैभव पाचपुते, अनिल ठवाळ, प्रशांत दरेकर, रफीकभाई इनामदार,अरुण पवार, बाबासाहेब चोरमले आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे