शिरवळ,दि.३० : – शिरवळसह, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यामध्ये कोयत्यांचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या कोयता गॅंगला शिरवळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.मनोज संदीपान शिंदे (वय ४२, रा. बोराटवाडी ता. इंदापूर जि. पुणे), सचिन प्रकाश जाधव (वय २८), अजय संजय आढाव (वय २१ दोघे रा. मेडद ता. माळशिरस जि. सोलापूर)अशी त्यांनी नावे असून या गँग वर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरामध्ये घुसून कोयत्याचा धाक दाखवित १९ वर्षीय युवतीचा अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या या आंतर जिल्हा सराईत टोळीच्या मुसक्या शिरवळ पोलीसांनी मोठ्या शिताफीने आवळल्या.कोयता गँगवर शिरवळ सोलापूर जिल्हा, सांगली, पुणे ग्रामीण
पोलीस स्टेशन हद्दीमधील तब्बल ८ गुन्हे दाखल आहेत. दहशत माजविणाऱ्या टोळीमधील तीन सराईत गुन्हेगार युवकांना पोलिसांनी जेरबंद केले आहे तर शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमधील अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरारी आहे. शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहितीनुसार शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये १९ वर्षीय युवतीचा अपहरण करण्याचा प्रयत्न या टोळीकडून करण्यात आला. या व्यक्तींवर कोयत्याचा धाक दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दखल करण्यात आला होता. यावेळी सातारा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दिक्षित, महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे, पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे, अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड, शिवराज जाधव यांच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यात सापळा रचत अटक केली आहे.व अपहरण गुन्ह्यातील संबंधितांना शिरवळ पोलीसांनी पोलीसी खाक्या दाखवताच चैन स्नॅचिंग, जबरी चोरी, दरोडा यासारख्या गंभीर ८ गुन्ह्यांची उकल होत लोणंद, नातेपुते, सांगोला, आटपाडी, दौंड, इंदापूर, लो णी काळभोर येथील पोलीस स्टेशन हद्दीमधील गुन्हे उघडकीस आणण्यात शिरवळ पोलीसांना यश आले आहे, शिरवळ पोलीसांनी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर संबंधितांना खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.शिरवळ पोलीस स्टेशनला १९ वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस
निरीक्षक नवनाथ मदने हे करीत आहे.