पुणे,दि.१७ :- जातपडताळणी प्रमाणपत्र देण्यात दिनांक- १६/१०/२०२१ रोजी रात्री ० ९ .४० वाजता वानवडी येथे आरोपी लोकसेवकाचे निवास्थानाजवळ. यातील तक्रारदार यांचे पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्याकरीता आरोपी लोकसेवकाने सुरूवातीस आठ लाख रूपये लाचेची मागणी करून नंतर 3 लाख रूपयांची लाच मागणी करून पडताळणी दरम्यान तडजोडीअंती 2 लाख रूपयांची लाच मागणी करून त्यापैकी 1 लाख 90 हजार रूपये लाच स्वीकारल्यावर त्यास रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई वानवडी येथे सापळा रचून करण्यात आली आहे.लोकसेवक – नितिन चंद्रकांत ढगे , वय ४० वर्षे , पद- उप आयुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पुणे . वर्ग -१असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या नावे आहेत.जात पडताळणी कार्यालयात तक्रारदार यांचे पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्याकरीता आरोपी लोकसेवकाने सुरूवातीस 8 लाख रूपये लाचेची मागणी करून नंतर 3 लाख रूपयांची लाच मागणी करून पडताळणी दरम्यान तडजोडीअंती 2 लाख रूपयांची लाच मागणी करून त्यापैकी 1 लाख 90 हजार रूपये लाच स्वीकारल्यावर त्यास रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सापळा कारवाईनंतर घेण्यात आलेल्या आरोपी लोकसेवकाच्या घरझडतीमध्ये रोख १ कोटी २८ लाख ४ ९ हजार रूपये , ( १,२८,४ ९ , ००० / – ) , मालत्तांची कागदपत्रे इत्यादीसह दोन कोटी ८१ लाख ८ ९ हजार ( २,८१,८ ९ , ००० / – ) इतक्या किंमतीची मालमत्ता मिळून आलेली आहे . ला . प्र . वि . पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे पुढील तपास करत आहेत .सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र , अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे व सुहास नाडगौडा , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली .व शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास १. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २. ॲन्टी करप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२०- २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ व्हॉट्स अॅप क्रमांकक्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .