कर्जत,दि.११:- कर्जत तालुक्यातील राशीन परिसरातील राशीन ते करमाळा रोडवरील साईराज मशिनरी नावाचे दुकान फोडणाऱ्या तीन सराईतांपैकी पोलिसांनी एकास अटक केले आहे.चोरट्यांनी दुकान फोडल्याची कबुली दिली असून,गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट गाडी व ७३हजार९५० रु.च्या तीन गोण्या १४७किलो कॉपर वायर जप्त करण्यात आली.आरोपीवर बीडमध्ये चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
सोयब कमरोद्दीन शेख,फारुख शेख ( फरार ),सलमान शेख ( फरार ) यापैकी सोयब कमरोद्दीन शेख यास अटक करण्यात आली आहे.कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना खबर मिळाली कि, आरोपी हे बीड जिल्ह्यातील मोमीनपुरा भागात आहेत त्यानुसार सापळा रचून एक टिम तयार करून त्यामध्ये पोसई भगवान शिरसाठ, पो.हे.कॉ तुळशीदास सातपुते,पोलीस अंमलदार सागर म्हैत्रे, गणेश ठोंबरे,भाउसाहेब काळे,संपत शिंदे, गणेश भागडे यांना तपासाच्या योग्य सुचना दिल्या. त्यानंतर तपासात राशिन,कोर्टी,करमाळा,नान्नज,जामखेड, सौताडा,पाटोदा,मांजरसुंबा,बीड शहर या ठिकाणी सी.सी. टी.व्ही चेक केले त्यानुसार राशीन वरून करमाळा रोडने जामखेड मार्गे बीडकडे आरोपी गेल्याचे त्यांनी तपासात निष्पन केले.सराईत गुन्हेगार असून त्यांच्या अटकेने अनेक गुन्ह्यांचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
व्यापारी, दुकानदार व नागरिकांनी आपल्या दुकानात आणि परिसरामध्ये जास्तीत जास्त सीसीटीव्ही लावून घ्यावे. जेणेकरून असा कोणताही प्रकार घडल्यास आपल्याला आरोपी निष्पन्न करणे आणि आरोपी अटक करणेकामी मदत होईल. पुढील काळात होणाऱ्या चोऱ्या सुद्धा थांबविता येतील.
चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, कर्जत पोलीस स्टेशन.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील अहमदनगर जिल्हा,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल , उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षीक भगवान शिरसाठ,पोलीस अंमलदार, तुळशीदास सातपुते,सागर म्हैत्रे, गणेश ठोंबरे,भाऊसाहेब काळे, संपत शिंदे, देवीदास पळसे, गणेश भागडे, संभाजी वाबळे, मारुती काळे यांनी केली..