श्रीगोंदा प्रतिनिधी,दि.१६ :- श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील फुले-शाहु-आंबेडकर विचारक बहुउद्देशीय संस्था संचलित आश्रय अनाथ बालसंगोपन वसतिगृहाच्या ईमारतीचे भुमीपुजन श्रीगोंदा तालुक्याचे आमदार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उत्साहात संपन्न झाले. या वेळी आमदार बबनदादा पाचपुते यांनी आश्रय अनाथ बालसंगोपन वस्तीगृहाला लगेच आर्थिक मदतही केली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय जनता पक्षाचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष संदिप नागवडे,येळपणे जिल्हा परिषद गटाचे युवा नेते सतीश धावडे,भारतीय जनता पक्षाचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक,युवा नेते विश्वासराव गुजांळ,ढवळगावचे सरपंच रवींद्र शिदे,मा.सरपंच विजय शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब शिंदे,मा.चेरमन गौतम वाळुंज,मेजर रामचंद्र लोंढे, ग्रामपंचायत सदस्य गणेश पानमंद,मनोहर बोरगे, दिगंबर धोत्रे, रामदास बोरगे,किसनराव शिंदे,दादा सावंत, नितीन शिंदे, दिलखुस सावंत,रमेश सावंत,भरत शिंदे, अनिल वाळुंज,आबा कौवठाळे,युवराज सावंत,श्रीकांत जाधव, भाऊ शेठ पवार युवा उद्योजक सचिन लोखंडे,अमोल कौठाळे, माऊली बनकर आदी उपस्थित होते.
चौकट :-फुले-शाहू-आंबेडकर विचार बहुउद्देशीय संस्था संचालित आश्रय अनाथ बालसंगोपन वस्तीगृह ही संस्था अनाथ- निराधार मुले,गरीब पालकांची मुले,परित्काकता महिलांची मुले,वीटभट्टी कामगार,ऊसतोड मजूर,स्थलांतरित कामगार,गरजू विद्यार्थी इत्यादी प्रकारच्या मुला-मुलींची निवासाची भोजनाची व शिक्षणाची मोफत सोय करणार आहे.
अमोल किसन बोरगे(संस्थापक अध्यक्ष फुले-शाहू-आंबेडकर विचार बहुउद्देशीय संस्था)
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे