पिंपरी चिंचवड, दि.१५ :- रहाटणी व जगताप डेरी चौकातील स्पॉट-18 आणि ‘योलो’ बार अँड रेस्टो निर्बंधांचे उल्लंघन करुन रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या पब.व हॉटेलवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी छापा टाकला. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन हॉटेल्सवर केलेल्या या कारवाईमध्ये 218 जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून रोकड व इतर साहित्या जप्त केले आहे. रहाटणी येथील जगताप डेरी चौकातील स्पॉट-18 आणि ‘योलो’ बार अँड रेस्टो येथे ही कारवाई केली. तसेच विनामास्क 105 ग्राहकांवर कारवाई करुन 52 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज नेवाळे आणि इतर आरोपींनी 18 डिग्रीज डिजे लाउन हा बार रात्री उशीरापर्यंत सुरु ठेवला. यामुळे या ठिकाणी ग्राहकांनी गर्दी केली होती. आरोपी आणि ग्राहकांनी कोरोना निर्बंधाचे उल्लंघन केले. यासंदर्भात पोलिसांना गोपनीय माहिती मिळताच सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी छापा टाकून 1 लाख 400 रुपये रोख रक्कम जप्त केली सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी योलो बार अँड रेस्टोचा मालक समीर वाघज याच्यासह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच विनामास्क प्रकणी 113 जणांविरोधात कारवाई करुन त्यांच्याकडून 56 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. योलो बार रेस्टॉ या हॉटेलवर छापा टाकून त्यांच्याकडून 74 हजार 220 रुपये जप्त केले.
सहायक पोलीस आयुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले की, रात्री दहापर्यंत हॉटेल सुरु ठेवण्याची परवानगी असतानाही आरोपींनी
हॉटेल रात्री बारापर्यंत सुरु ठेवले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे