कर्जत,दि.१३ :- कर्जत तालुक्यातील मिरजगांव येथील जिल्हा परिषद शाळेतील अंदाजे १ लाख रु. किमतीच्या एल.ई.डी इंटरऍक्टिव्ह पॅनेल संचावरच दि.३ रोजी चोरट्यांनी डल्ला मारला होता.शाळेतील डिजिटल रूमचा दरवाजा तोडून PANACHI कंपनीचा एल.ई.डी.इंटरऍक्टिव्ह संच सर्व किटसह चोरून नेला होता.हा संच आ.रोहित पवार यांच्या वतीने देण्यात आलेला होता. कर्जत पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.द.वी.कलम ४६१,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
कर्जत पोलिसांकडुन या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गोपनीय खबऱ्याकडुन माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा स्वप्निल गायकवाड याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केलेला आहे. पोलिसांनी लागलीच त्याचा शोध सुरू केला. (दि.१० रोजी) स्वप्निल गायकवाड (रा.बेलगाव ता.कर्जत)पोलिसांच्या कचाट्यात सापडला. त्याकडे अधिक तपास केला असता सदरचा गुन्हा हा आरोपी गणेश निंबाळकर, वय २५ वर्षे,निखील पवार, वय २४ वर्षे,शुभम उर्फ भूंग्या गायवाड, वय २४ वर्षे या साथीदारांच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली.
या गुन्ह्यातील आरोपींचा कर्जत पोलीस स्टेशनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शोध घेऊन चोरीस गेलेल्या मालासह त्यांना आपल्या ताब्यात घेतले.ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलिस उपनिरीक्षक अमरजित मोरे,हेड कॉन्स्टेबल प्रबोध हांचे, बबन दहिफळे,पोलिस नाईक जितेंद्र सरोदे, रवी वाघ, सुभाष पडगळे,पोलीस कॉन्स्टेबल गणेश काळाने,महादेव कोहक आदींनी केली आहे.
शाळा-महाविद्यालयांनी सतर्क राहावे!
सध्या अनेक शाळा-महाविद्यालये कोरोनामुळे बंद आहेत याचा फायदा चोरटे घेऊ शकतात.त्यामुळे महागड्या किमती वस्तू सीसीटीव्हीच्या निगरानीखाली ठेवाव्यात.जिथे वस्तू ठेवल्या आहेत तिथे लोखंडी दरवाजे बसवावेत.जर अशा घटना होऊ नयेत यासाठी काळजी घ्यावी. -चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे