पुणे,दि०३: – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 99.63 टक्के एवढा लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत निकालात 8.97 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर औरंगाबाद या विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.करोनाच्या प्रादुर्भावामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल लावण्याचे निकष तयार करून त्याची अंमलबजावणीही करण्यात आलेली आहे. दहावीसाठी 30 टक्के, अकरावीसाठी 30 टक्के, बारावीसाठी 40 टक्के याप्रमाणे 100 टक्के गुणाप्रमाणे मुल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला आहे.
राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी निकाल जाहीर केला आहे.विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. विषयनिहाय संपादीत केलेले गुणाच्या माहितीची प्रिंटही विद्यार्थ्यांना काढून घेता येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील 13 लाख 19 हजार 754 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती.
विभागीय मंडळनिहाय टक्केवारीत निकाल –
पुणे – 99.75 नागपूर- 99.62 , औरंगाबाद- 99.34 , मुंबई- 99.67 , कोल्हापूर- 99.67 , अमरावती- 99.37 , नाशिक- 99.61 , लातूर- 99.65 , कोकण – 99.81 .
निकाल –
मुले – 99.53 टक्के
मुली -99.63 टक्के
कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल पाहण्यासाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाशिवायची इतर सांख्यिकीय माहिती www.mahresult.nic.in आणि https:msbshse.co.in या संकेतस्थळावर मिळणार आहे.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ
1) https://hscresult.11thadmission.org.in
2) https://msbshse.co.in
3) hscresult.mkcl.org
4) mahresult.nic.in