पुणे,दि.०२ :-पुणे शहर पोलिस दलातील 4 पोलिस निरीक्षकांच्या आज (सोमवार) अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीचे आदेश अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी काढले आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मान्यतेने 4 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.अंतर्गत बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांचे नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे हे पुढील प्रमाणेसंपत ज्ञानोबा भोसले (वपोनि, मुंढवा पो.स्टे.ते आर्थिक व सायबर गुन्हे)ब्रम्हानंद रावसाहेब नाईकवाडी (वाहतूक शाखा ते वपोनि, मुंढवा पो.स्टे.)विजयकुमार आप्पासाहेब शिंदे – (पोनि, गुन्हे, मुंढवा पोलिस स्टे. ते पोनि, गुन्हे, विश्रांतवाडी पो.स्टे.)संदिप पांडुरंग भोसले (आर्थिक गुन्हे शाखा ते पोनि, गुन्हे, फरासखाना, पो.स्टे.).