पुणे,दि.2:-पूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या पूजा चव्हाण
आत्महत्या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे. पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला असून आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. या सर्व संभाषणांचं रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलं आहे. ९० मिनिटं हे संभाषण झालं, असं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. यामुळे आता संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे.पूजा चव्हाणने ७ फेब्रुवारीला पुण्यात इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. पूजा चव्हाण आत्महत्येला तत्कालिन वनमंत्री शिवसेनेचे यवतमाळमधील आमदार संजय राठोड यांना जबाबदार धरण्यात आलं.पुजा चव्हाणने ७ फेब्रुवारीला पुण्यात इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. पूजा चव्हाण आत्महत्येला तत्कालिन वनमंत्री शिवसेनेचे यवतमाळमधील आमदार संजय राठोड यांना जबाबदार धरण्यात आलं.विरोधकांनी हे प्रकरण लावून धरत तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर राठोड यांनी २८ फेब्रुवारीला विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या एक दिवस आधी राजीनामा दिला. तथापि, पूजाच्या आई-वडिलांनी या प्रकरणी वानवडी पोलिसांकडे जबाब नोंदवला होता. मुलीच्या आत्महत्येनंतर घडलेला सर्व प्रकार हे राजकीय नाट्य होते, असा गौप्यस्फोट जबाबात त्यांनी केला होता. त्यानंतर राठोड यांना क्लिनचीट मिळणार अशी चर्चा रंगली होती. दरम्यान, आता समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणाला नवं मिळण्याची शक्यता आहे.
प्राथमिकदृष्ट्या फोनमधील संभाषणावरुन समोरील व्यक्ती संजय राठोडच असल्याचं स्पष्ट होत आहे. पूजा चव्हाणने आपली सर्व संभाषणं रेकॉर्ड केली होती. हे संभाषण बंजारा भाषेत झालं असल्याने आम्ही भाषांतर करुन घेत आहोत, अंस पोलीस सुत्रांनी सांगितलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाचा मोबाइल फोन ज्यामध्ये सर्व संभाषणांचं रेकॉर्डिंग आहे तो फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस मोबाइलमधील सर्व डेटा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच आत्महत्येच्या २४ तास आधीचं यवतमाळ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळवलं असून फॉरेन्सिकसाठी पाठवलं आहे.मूळची बीडची असणारी पूजा शिक्षणासाठी पुण्यात राहत होती. दरम्यान, त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, फुटेजमध्ये पूजा राठोड ही संजय राठोड यांचा निकटवर्तीय अरुण राठोडसोबत दिसत आहे. अरुण आणि संजय राठोड यांचा अजून एक सहकारी विलास चव्हाण हे पूजासोबत पुण्यातील मोहम्मद वाडी येथील हेवन पार्कमध्ये एका भाड्याच्या घरात राहत होते. तिथेच तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणाचा तपास सुरु असल्यामुळे आम्ही कोणतीही माहिती देऊ शकत नाही, असं पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं. तर संजय राठोड यांनी यावर प्रतिक्रिया दण्यास नकार दिला आहे. मला काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही. पोलीस तपास करत आहेत. जेव्हा हा तपास पूर्ण होईल तेव्हा मी यावर बोलेन असं संजय राठोड म्हणाले.