पुणे, दि.०२ :- एकीकडे महाराष्टात ओला दुष्काळ असल्यासारखी परिस्थिती आहे.व पुण्याजवळ ची सर्व धरणे पूर्ण भरली आहेत. ग्रेड ए पुणे महापालिका असूनही दुष्काळी भागासारखी परिस्थिती उरुळी देवाची या गावातील लोकांची झाली आहे .पत्रे लिहली ,निवेदने दिली ,आक्रोश मांडला, पण महापालिका अजुन ही जागी होईना आणि उरुळी करांची दैना संपेना. लाखो रुपये खर्च करून पुणे महापालिकेने मंतरवाडी आणि उरुळी देवाची या गावाला बंद पाइपलाइनच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे काम पूर्ण होऊनही पाणी सुरू होत नाही . मंतर वाडीत पाणी येते परंतु उरुळीत पाणी नाही .सध्या कोरोणाचा संसर्ग होऊ नये यासाठी टँकर ला होणारी गर्दी टाळून पाइपलाइन ने पाणी सरू करावी अशी मागणी पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडे भारिप चे शहराध्यक्ष व उरुळीचे माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी करूनही कोणत्याही प्रकारची दखल आजपर्यंत घेतली नाही . उलट अजुन टँकर भोवती गर्दी जास्तच वाढत आहे . उरुलीत सद्या टँकर जवळ मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाणी भरण्यासाठी होते. या मुळे कोरोणा चां प्रादुरभाव होण्याचा धोका नाकारण्यात येवू शकत नाही.
ऊरूळी देवाची गावासाठी यापूर्वीच पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च पुणे महानगर पालीकेच्या वतिने करण्यात आलेला आहे.शिवाय 10 दशलक्ष लिटर ची पाण्याची टाकिही कचरा डेपोजवळ बांधून बऱ्याच दिवसापासून तयार आहे .कचराडेपो परिसरात नलीकेद्वारे पाणी पुरवठा केला जातो त्या प्रमाणे ऊरूळी देवाची गावास का केला जाऊ शकत नाही. सद्याची परिस्थिती करोनामुळे गंभीर आहे.पुण्यातील वाढता कोरोना चा धोका लक्षात घेऊन जिथे जिथे गर्दी टाळता येईल तिथे गर्दी टाळू शकतो व कोरोणा ला थांबवू शकतो .त्याप्रमाणे उरुळी देवाची येथील टँकर बंद करून परिसरातील नागरिकांना गर्दीपासून रोखणे शक्य आहे .तरीही महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अतुल बहुले यांनी केला आहे.तरी टॅंकरवर पाणी भरणे धोक्याचे आहे, शिवाय सद्या पावसाळी दिवस असल्यामुळे अजूनही लोकांना त्रास होऊ शकतो .कामगार लोकांना पाणी भरल्याशिवाय कामाला जाता येत नाही ,पाण्यासाठी लहान मुलांना ही टँकर वर चढून पाणी भरावे लागते .यामुळे लोकांन्ना कोरोनाची लागण होवु शकते.त्वरित नलीकेद्वारे पाणी ग्रामस्थांना सुरु करणेत यावे.येत्या चार दिवसात महापालिकेवर हंडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी दिला आहे.