पुणे,दि २४ :- आळंदी नगरपरिषद हद्दीतील स.नं .१२५ / ७ ब नगरपरिषद जागेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नियोजित स्मारक विकसित करण्यात येणार आहे . यासाठी आळंदी नगरपरिषद सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक ५१ नुसार स्मारकाचे कामास मान्यता देण्यात आली असल्याने यावर्षीची साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती १ ऑगस्ट २०२१ ला नियोजित स्मारकाचे जागेत व्हावी अशी मागणी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केली. या प्रसंगी मोहम्मद शेख, सुरेखा भालेराव, निलमताई सोनवणे, प्रदीप पवार, दत्ता कांबळे, संतोष कदम, सुनील भिसे, संतोष सोनवणे, ज्ञानेश्वर लोहार, सोमनाथ साखरे, नानासाहेब मोरे, गणेश मुंजाळ, उद्धव कांबळे, सदाशिव साखरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.या मागणीसाठी झोपडपट्टी सुरक्षा दलाने आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव व अधिकाऱ्यांची भेट घेतली. अण्णा भाऊ साठेंचे स्मारक नियोजित जागेत व्हावे, पथारी धारकांचा सर्व्हे होवून त्यांची नोंद व्हावी, रमाई माता घरकुल योजनेतील लाभार्त्याना घरे मिळावीत. अशा विविध मागण्या करण्यात आल्या व सविस्तर चर्चा करण्यात आली. या सर्व मागण्यांना नगरपरिषद मुख्याधिकारी जाधव व अधिकाऱ्यांनी एक मुखाने अनुमोदन देऊन आळंदीतही साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची यावर्षीची जयंती आळंदी नगरपरिषद हद्दीतील स.नं .१२५ / ७ ब नगरपरिषद जागेत विकसित होणाऱ्या जागेत होईल अशी त्यांनी ग्वाही दिली.याच बरोबर महाराष्ट्र राज्य कामगार पथारी सुरक्षा दलाच्या वतीने दीनदयाळ भाजी मंडईच्या शाखेचे भव्य उदघाटन आळंदी देवाची या ठिकाणी करण्यात आले. अशी माहिती झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी दिली.