लातुर : दि. ३० – लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील भूमिहीन लाभार्थी उपोषणास बसलेले आहेत. या उपोषणस्थळी लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे आणि सुरेंद्रभाई आकनगिरे यांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला.उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांना दिले.उपोषणास बसलेल्या निराधार व भूमिहीन लाभार्थ्या समोर या प्रसंगी बोलताना लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांना आवाहन केले की औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाप्रमाणे रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील ३४६ एकर जमिनीचे वाटप भूमिहीन लाभार्थी यांना करण्यात यावे.सोमवार दि. २८ जुन २०२१ पासून कामखेड्यातील भुमिहिन लाभार्थी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रांगणात उपोषणास बसलेले आहेत. कामखेडा ता रेणापूर येथील ३४६ एकर सिलिंग जमीनचे वाटप करण्यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने दि ५ डिसेंबर २०१८ रोजी निर्णय दिला असून त्या आदेशानुसार येथील रहिवासी व भूमिहीनांना या सीलिंग जमिनीचे वाटप केले जावे. तसेच कामखेडा गावातील गायरानावर ज्या ज्या लोकांनी अतिक्रमण केले आहे ते अतिक्रमण हटविण्यात यावे. अशीही मागणी व्यंकटराव पनाळे यांनी याप्रसंगी आपल्या भाषणातून केली आहे.याच मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी कामखेडा येथील निराधार महिला व पुरुष उपोषणास बसलेले आहेत. या उपोषणाची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सदरील उपोषणकर्त्यांची मागणी तातडीने मार्गी लावावी. असेही आवाहन पनाळे यांनी प्रशासनास केले आहे.सिलिंग जमीन बचाव कृती समिती तर्फे हे उपोषण सुरू करण्यात आले असुन या आंदोलनाचे नेतृत्व उपोषणार्थी उत्तम खंडागळे आणी समाधान येदे हे करीत आहेत. तर उपोषणास दत्तू खंडागळे, गोपीनाथ खंडागळे, गणपत खंडागळे, विष्णू कदम, गंगाधर खंडागळे नितीन खंडागळे, केरबा कदम, शांताबाई शिंदे, लोचना बाई, शिवाजी सूर्यवंशी, राजाभाऊ कदम, मदन सूर्यवंशी, बालिका जोगदंड आदी उपोषणास बसले आहेत.
औसा ता. लातूर जिल्हा :-लक्ष्मण कांबळे