पुणे दि २८ :- पुणे शहरात मोटारीतून टेम्पोचालकाचा पाठलाग करून त्यांना अडवून टेम्पो आणि मोबाईलची जबरी चोरी करणाीऱ्या त्रिकुटाला 12 तासाच्या आत लोणीकंद पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून टेम्पो, मोटार, मोबाइल असा 8 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सागर कैलास नवले (वय 31, रा. राहू) , दौंड सागर बापू मेमाणे (वय 29, रा. मेमाणेवाडी, दौंड) , आणि सुनील जनार्दन ढवळे (वय 28, मेमाणेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.वाडेबोल्हाई गावच्या हद्दीत 26 जूनला टेम्पोचालकाला अडवून चोरट्यांनी टेम्पोसह मोबाईल चोरून नेला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे यांच्याकडून तपास करण्यात येत होता त्यावेळी पोलीस अमंलदार समीर पिलाणे आणि बाळासाहेब तनपुरे यांना आरोपी न्हावी सांडस गावच्या हद्दीतील नदीकाठी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्रिकुटाला ताब्यात घेतले. अवघ्या 12 तासात लोणीकंद पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणल्यामुळे कौतुक केले जात आहे.व त्यांचे कडुन जबरीने चोरुन नेलेला टेम्पो , मोबाईल तसेच गुन्हयात वापरलेली स्कॉपीओ असा कि . रु . ८,००,५०० / – रु . चा माल जप्त करुन सदर दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे . सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त परि . ०४ पंकज देशमुख, पोलीस आयुक्त येरवडा विभाग किशोर जाधव , थ.पो.नि. प्रताप मानकर, पो निरी विनायक वेताळ, यांचे मार्गदर्शनात तपास पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक सुरज किरण गोरे , सहा . फौजदार मोहन चाळके , पोना कैलास साळंके , पोना अजित फरांदे , पोना विनायक साळवे , पोलीस अंमलदार समीर पिलाणे , सागर कडु , बाळासाहेब तनपुरे यांनी केली .