पुणे दि २५ :- पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ४ चे चतुर्शिंगी पोलीस स्टेशन हद्दीतील औंध परिसरातून कोकेन विक्री करणाऱ्या एका नायजेरियन तस्कराला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून तब्बल ४७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. फिलीप्स ईदेली वय ४२ रा , मोरया पार्क , दुसरा मजला , नवी सांगवी पुणे असे अटक केलेल्या नायजेरियन व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी चतुर्श्रुंगी पो. स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरात सुरु असणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने युनीट -४ तसेच अं.प.वि.प -२, गुन्हे शाखा पुणे चे कर्मचारी औंध परिसरात गस्त घालत होते. युनिट ४ पथकातील पो. हवा. रुपेश वाघमारे व पो.ना. दत्तात्रय फुलसुंदर यांना माहिती मिळाली की, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, यांचे माळी प्रशीक्षण केंद्र जवळ , औंध , पुणे परिसरात एक नायजेरियन व्यक्ती अंमली पदार्थ विक्री करिता येणार आहे. त्यानंतर पोलिसांनी औंध, परिसरात सापळा रचून आरोपीला अटक केली. यावेळी त्याच्याकडून ४७ हजार ५०० रुपयांचे ५ ग्रॅम ४६० मिलीग्रॅम कोकेन जप्त केले आहे.सदरची कारवाई ही . पोलीस आयुक्त. अमिताभ गुप्ता ,पोलीस सह आयुक्त डॉ . रविंद्र शिसवे ,अपर पोलीस आयुक्त , अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त. श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे -२ लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली
युनीट ४ गुन्हे शाखा पो.उप – निरीक्षक जयदीप पाटील,पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे , दत्तात्रय फुलसुंदर, प्रवीण भालचिम, स्वप्निल कांबळे, सागर वाघमारे तसेच अं.प.वि.प -२ कडील पोलीस निरीक्षक खांडेकर, पोलीस अंमलदार गायकवाड, आजीम शेख चालक बास्टेवाड, यांनी केली आहे.