श्रगोंदा १५:- गरीब कुटुंबांनी आयुष्यभराची कमाई पतसंस्थेत जमा केली. पण या पतसंस्थेने या गरीब कुटुंबांवर आज न्यायासाठी संघर्ष करण्याची वेळ आणली आहे.पतसंस्थेत पैसे अडकल्याने अनेक ठेवीदारांचे संसार रस्त्यावर आले आहेत. काष्टी येथील धनश्री पतसंस्थेच्या अध्यक्षा ज्योती गवळी व रमेश गवळी या दाम्पत्यांनी ठेवीदारांचे ४५ लाख रुपये बुडवून पसार झालेल्या आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी सोमवारी तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांच्यासह ठेवीदारांनी अर्धनग्न आंदोलन केले.सविस्तर वृत्त असे कि,गु.र.नं ६१८/२०२० या मध्ये गवळी दाम्पत्याने पतसंस्थेत ४५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एक वर्षापूर्वी सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचे संचालक मंडळ व सचिव यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, ज्योती गवळी व रमेश गवळी यांनी पुणे येथे
नवीन व्यवसाय सुरू केल्याची चर्चा आहे.आरोपींना अटक करून ठेवीदारांचे पैसे मिळवून द्यावेत, या मागणीसाठी सोमवारी हे उपोषण करण्यात आले. श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांकडे अनेक वेळा पाठपुरावा करून देखील आरोपींना अटक करण्यात येत नाही.या आरोपींना पोलीस प्रशासन पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच पोलीस अधीक्षक यांकडे देखील वारंवार पाठपुरावा केला आहे. तरी देखील आरोपींना अटक होत नसल्याने नाईलाजास्तव आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली आहे. कोरोनामुळे जास्त लोकांना आंदोलनाची परवानगी नसल्याने ठेवीदारांसोबत आंदोलनास बसलो आहोत.आरोपींना अटक न झाल्यास सहकुटूंब आंदोलन सुरू करू कर्जत येथे डि.वाय.एस.पी कार्यालय व नगर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल असे भोस यांनी सांगितले आहे. संस्थेचे सर्व ठेवीदार हे आर्थिक दृष्ट्या मेटाकुटीला आले असून लॉकडाऊनमुळे अर्थकारण पूर्णपणे अडचणीत आले आहे.त्यामुळे ठेवीदारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.त्यामुळे श्रीगोंदा पोलिस निरीक्षक ढिकले यांच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या आंदोलनात भोस यांच्यासह डॉ.पांडुरंग दातीर,भानुदास राहिंज,बबनराव पाचपुते,अंबादास राहिंज,आदी सहभागी झाले होते. आर्थिक गुन्ह्यातील आरोपी आढळून येत नाहीत ही श्रीगोंदा पोलीस यांनी केलेली अर्थपूर्ण तडजोड आहे.भोर व पोलीस निरीक्षक ढिकले यांचे आरोपींशी संबध असू शकतात त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले जावेत अशी तक्रार पो.अधीक्षक यांकडे करणार आहे.आरोपींना अटक करणे त्या शिवाय माघार नाही, अशी भूमिका टिळक भोस यांनी मांडली,आमच्या जीवितास काही झाल्यास ढिकले हे जबाबदार असतील.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे