पुणे दि ३१ – राज्यात पॉझिटीव्हिटी दर दहा टक्क्यांपेक्षा कमी असणाऱ्या महापालिका आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लॉकडाऊनमधील निर्बंध शासनाने शिथिल केले आहेत. त्यामुळे पुणे महापालिका क्षेत्रात दुकाने उघडी ठेवण्यास दोन वाजेपर्यंत मुभा असणार आहे.मात्र, पुणे जिल्ह्याला ही सवलत मिळणार नाही. जिल्ह्यात असणारे निर्बंध कायम राहणार असले तरी त्यात वाढ होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर पुणे शहरातही तीन वाजल्यानंतर विनाकारण बाहेर पडण्यास परवानगी नाही. याबाबतचे आदेश राज्यसरकारने रविवारी काढले.आहे पुणे जिल्ह्यासाठी 12 मे 2021 चे ब्रेक दि चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील. त्यासाठी राज्य सरकारने 29 मे 2021 चा पॉझिटीव्हिटी दर गृहीत धरला आहे.पुण्यात शिथिल झालेले निर्बंध…
सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांच्या वेळा (केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील.आवश्यक नसलेल्या वस्तूंच्या ई कॉमर्सद्वारे वितरणास मान्यता दुपारी 3 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध करोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त अन्य शासकीय कार्यालयांत 25 टक्के उपस्थितीला परवानगी. अधिक उपस्थितीस आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्याची परवानगी आवश्यक.कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी 2 पर्यंत सुरू राहू शकतील. त्यापार्श्वभुमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत शहरातील नव्या निर्बंधांबाबतची माहिती दिली आहे.आता पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहणार आहेत. व स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते तसेच शनिवार, रविवार सुरू ठेवण्यास परवानगी देऊ शकते.