श्रीगोंदा(नगर) दि २२:- मेघना महाडिक (५७) यांचे शनिवारी पहाटे ६ वाजता निधन झाले. त्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे थोर देणगीदार रविंद्रराव महाडिक यांच्या पत्नी होत्या.सुरुवातीला महाडिक हया श्रीगोंदा शहरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. परंतु त्यानंतर त्यांची तब्येत जास्त खालावल्यामुळे त्यांना पुणे येथील खासगी हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारकामी दाखल करण्यात आले. तेथे उपचार चालू असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या अतिशय प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या.त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सुन,२मुली असा परिवार आहे.