पुणे दि २२ :- पुणे शहरातील दोन मोक्काच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना चतुःश्रृंगी पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातून सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 गावठी पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. सूरज उर्फ गणेश अशोक वड्ड (वय 24, रा. मंगळवार पेठ) व पंकज गोरख वाघमारे (वय 26, रा. गाडीतळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सूरज बंडू आंदेकर टोळीचा सदस्य आहे. बंडू आंदेकर टोळीवर नुकतीच मोक्कानुसार कारवाई केली आहे. यात सूरज याचा देखील समावेश आहे. तर या दोघांवर एका गुन्ह्यात चतुःश्रृंगी पोलिसांनी देखील मोक्का लावला आहे. दोन मोक्का कारवाई केल्यानंतर हे दोघे पसार झाले होते. त्यानंतर मात्र हे दोघे सापडत नव्हते. दरम्यान पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार पोलीस उप आयुका , परिमंडळ -४.पुणे शहर यांनी पोलीस स्टेशन हदीतील पाहिजे आसलेल्या फरारी आरोपींचा शोध घेण्याबाबत स्वतंत्र तपास पथक तयार केले होते.व पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी चतु : श्रृंगी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील पाहिजे व फरारी आरोपींची यादी तयार करून त्यामधील मोका व दरोडयातील सराईत आरोपी यांनी पाहिजे आसलेल्या आरोपी व सराईत गुन्हेगार यांची माहिती काढून त्यांना पकडण्याच्या पोलिसांना सुचना दिल्या होत्या.
यादरम्यान चतुःश्रृंगी पोलिसांच्या तपास पथकातील यांना गोपनीय बातमी मिळाली कि आदमापुर जि , कोल्हापूर येथे वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव यांचे नेतृत्वाखाली टिम तयार करून त्यांना दिनांक १९ / ०५ / २०२१ रोजी कोल्हापूर येथे पाठविले असता सदर पथकाने अदमापुर यातिकाणी जावून आरोपींचे ठावठिकाणाबाबत माहिती काढून आरोपी नामे १.सुरज ऊर्फ गणेश अशोक या वय २४ वर्ष रा .२२८ , मंगळवार पेठ पुणे , २.पंकज गोरख वाघमारे वय २६ वर्षे रा.महात्मा जोतिबा फुले शाळेजवळ , गाडीतळ हडपसर पुणे यांना दिनांक २०/०५/२०२१ रोजी कोल्हापूर येथे याठिकाणी सापळा रचून दोघांना अटक केली. यावेळी सूरज याच्याकडून 1 गावठी पिस्तुल व 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सूरज याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबर मारहाण यासह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त , पुणे शहर अमिताभ गुप्ता ,पोलीस सह आयुक्त.रविंद्र शिसये ,अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर नामदेव पहाण ,पोलीस आयुक्त परिमंडळ -४ पूर्ण शहर पंकज देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस आयुक्त , सारकी विभाग पुणे शहर रमेश गलांडे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , चतु श्रृंगी पो.स्टे , राजकुमार वाघचवरे , पोलीस निरीक्षक गुन्हे दादासाहेब गायकवाड , पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव , महेश भोसले , अमंलदार सुधीर माने , इरफान मोमीन , श्रीकांत वाधवले , तेजस चोपडे , संतोष जाधव , मुकुंद तास , दिनेश गहाल , प्रकाश आफाठ , प्रमोद शिये , ज्ञानेश्वर मुळे यांचे पथकाने करून प्रशसनीय कामगिरी केली आहे .