कल्याण दि १५ :- वर्षभराच्या प्रदीर्घ कालावधीनंतर क्रीडाक्षेत्र हळूहळू का हाेईना, पूर्वपदावर येताना पहावयास मिळत होते. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा नियम कठाेर करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रावर पूर्णपणे संक्रांत येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे यातील काळी खेळाचे प्रशिक्षक व संघटनांचे पदाधिकारी मिळून मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाच्या अध्यक्ष लक्ष्मण इंगळे यांनी सांगितले
काेराेनाचा उद्रेक झाल्यानंतर इतर क्षेत्रांप्रमाणेच क्रीडाक्षेत्रालाही मोठा फटका बसला. लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतर म्हणजेच, जानेवारी-फेब्रुवारी २०२१ पासून क्रीडाक्षेत्र हळूहळू पूर्वपदावर आले हाेते. परंतु, मागील काही दिवसांपासून काेराेनाचा उद्रेक पुन्हा वाढला आहे. काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी नियम आणखी कठाेर करण्यात आले आहेत. याचा फटका आता क्रीडा क्षेत्रासह बसू लागला आहे. प्रसार रोखण्यासाठी काही कडक निर्बंध आणि नियम लागू केले असून याचा फटका राज्यातील क्रीडा क्षेत्राला बसणार आहे. काही क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण वर्ग नुकतेच सुरू झाले हाेते. मात्र, काही दिवसांतच हे वर्ग बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. परिणामी क्रीडा प्रशिक्षकांवर पुन्हा संकट येणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साेबतच जिल्हातील खो-खो, धनुर्विद्या, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलिबॉल व अन्य मैदानी खेळ तर स्केटिंग, बास्केटबॉल, बॅडमिंटन, ज्युडो, कुस्ती व योगा यांच्यासह इतर खेळांवर संकट उभे राहणार आहे.
*चाैकट…*
क्रीडा प्रशिक्षकांसाठी गतवर्षी अतिशय भयावह परिस्थिती होती. त्यातून कसेबसे ते सावरत असतानाच सध्याच्या संचारबंदीमुळे प्रशिक्षकांसह त्यांचे कुटुंबही अडचणीत आले आहे. अशा काळात शासनाने प्रशिक्षकांचा विचार करणे आवश्यक आहे.
प्रतिक्रिया
लोक डाऊन मुळे महाराष्ट्र शासनाने सर्व क्षेत्रामध्ये पूर्णपणे निर्बंध लागल्यामुळे क्रीडा क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले असून क्रीडा क्षेत्रातील कोणतीच ऍक्टिव्हिटी.. सध्या सार्वजनिक रित्या घेऊ शकत नाही त्यामुळे प्रशिक्षक यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे यामध्ये शासनाने लवकरात लवकर लक्ष घालून क्रीडा क्षेत्राला आधार द्यावा.पंकज पवार शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू