श्रीगोंदा दि ०९ :-पोलीस अधिक्षक मनोज पाटील अहमदनगर, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल अहमदनगर, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव कर्जत विभाग यांचे मार्गदर्शनाखाली Covid -19 चे संक्रमण वाढु नये म्हणुन, दि. १९ फेब्रुवारी २०२१ ते ८ मे २०२१ या कालावधीत श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांनी नाकेबंदी, पेट्रोलिंग करुन,श्रीगोंदा शहर व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मास्क न लावता फिरणारे, सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणारे व सोशल डिस्टसिंगचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर २६३५ केसेस करुन ७,९४,८०० रु. दंड आकारणी केली आहे.अहमदनगर ते दौंड रोडवर काष्टी येथे अंतरजिल्हा चेकपोस्ट लावुन, वाहने चेक करुन, विनापरवाना इतर जिल्ह्यातुन येणारे, वाहन चालक, वाहनांमध्ये ठरवुन दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. श्रीगोंदा शहरात सकाळी ८ वाजेपासुन रात्री ९ वाजेपर्यंत पेट्रोलिंग करीता अधिकारी व अंमलदार नेमुन कोरोनाचे अनुषंगाने नियमितपणे कारवाई चालु केली आहे.ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे,लसिकरण केंद्र या ठिकाणी नागरिकांची गर्दी होवु नये म्हणुन, पोलीस बंदोबस्त लावण्यात येतो. पोलीस स्टेशन हद्दी मधिल गावांमध्ये पेट्रोलिंग करिता अधिकारी व अंमलदार नेमण्यात येतात. सर्व नागरिकांनी कोरोनाचे अनुषंगाने दक्षता घेणे आवश्यक आहे. विनाकारण घराबाहेर पडु नये.मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा.लसिकरण केंद्र,दवाखाना या ठिकाणी गर्दी करु नये मेडीकल,किराणा दुकाने, बँका, पतसंस्था या ठिकाणी सोशल डिस्टसिंगचे पालन करावे नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती श्रीगोंदा पोलीस ठाण्याने प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे