कर्जत दि ०७:-कर्जत तालुक्यातील माहीजळगांव येथील मिना सर्जेराव महारनवर, वय ५० वर्षे हे दि.५ मे रोजी रात्रीचे जेवण करुन कुटूंबासह घरामध्ये झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घराचे जिन्यावाटे घरामध्ये प्रवेश करुन यांना मारहान करुन घरातील कपाटामध्ये असलेले सोने,चांदीचे दागिणे, रोख रक्कम असा एकूण ३,७०,०००रुपयांचा ऐवज दरोडा व घरफोडी करुन चोरुन दरोडेखोरांनी पोबारा केला होता. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.कर्जत पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे.एवन हैवान काळे, वय.३० वर्षे,रा.चिखली,ता.आष्टी,जि. बीड , मनिषा एवन काळे, वय.३५ वर्ष ,रेखा जनार्धन काळे, रा.माहिजळगाव,ता.कर्जत, कांचन एवन काळे, रा. चिखली,ता.आष्टी यांना अटक केली.आरोपींविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.सदर घटनेबाबत सर्जेराव महारनवर, यांनी कर्जत पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.दाखल गुन्हयातील गेलेल्या मालाचा व अज्ञात आरोपींचा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना.सुनिल चव्हाण यांना गुप्त खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा एवन काळे, रा.चिखली,ता.आष्टी,जि.बीड याने व त्याचे तीन साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती मिळाली.
वरील माहितीच्या आधारे आण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधीकारी कर्जत विभाग, पो.नि. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व पो.नि. चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली वरील पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरुन आरोपींचे ठावठिकाणाबाबत गोपनिय माहिती घेवून रात्रीचे वेळी सापळा लावून व पाठलाग करुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले.अधिक चौकशी केली असता गुन्हा केल्याचे कबुल केले.सदर गुन्ह्याचा तपास उघडकीस आण ण्या करिता कर्जत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर याची वेगवेगळी पाच पथके तयार करुन तपासाबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.
आरोपीच्या राहत्या घरात प्रसंगवधान दाखवुन स.पो.नि सुरेश माने, स.पो.नि सोमनाथ दिवटे,पो.स.ई अमरजित मोरे व स्टाफ यांनी आरोपींच्या घराची झाडा झडती घेतली त्यावेळी गुन्हयातील चोरी गेलेला मुद्देमाल मिळुन आला. चोरीतील सोन्याचे दागिणे असा एकुण ३० तोळे १५,००,००० रु. किमतीचे सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत. तसेच आरोपीच्या घरातुन एक रामपूरी चाकू, लोखंडी कटावनी, ३०,००० रु.किमतीचे ३ वेगवेगळ्या कंपन्याचे मोबाईल हॅन्डसेट, ५,००,००० रु. किमतीची स्कॉर्पिओ जिप एम.एच १७-ए.जे ३५९८ व रोख रक्कम १०५०० रुपये असा एकूण २०,४०,५०० रु. किमतीचे सोन्याचे दागिणे, वाहन, मोबाईल व हत्यारे जप्त करण्यात आलेले आहेत.एवन हैवान काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुध्द यापूर्वी अंभोरा पो.स्टे. जि. बीड येथे गुरनं. १५१/२०१७ भादवि कलम ३९५ सह मोक्का कायदा कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदरची कारवाई ही मनोज पाटिल साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, आणासाहेब साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, कर्जत यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर व कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व अंमलदार यांनी संयुक्तरित्या केलेली असुन गुन्हयाचा पुढील तपास पो.स.ई अमरजित मोरे, कर्जत पोलीस स्टेशन हे करत आहेत.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे