श्रीगोंदा दि २२ :-मागील काही दिवसांपासून अहमदनगर,पुणे,सोलापुर जिल्ह्यात धुमाकूळ घालुन मोटारसायकल, चारचाकी वाहन चोरी, घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार श्रीगोंदा पोलीसांच्या जाळ्यात अखेर जेरबंद झाला असून त्याचेकडून तब्बल ४ लाख १० हजार रु.किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आहे.त्यामुळे श्रीगोंदा पोलीसांच्या या दमदार कामगिरीचे सर्वच स्तरारतून कौतुक होताना दिसत आहे.श्रीगोंदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१४ मार्च रोजी फिर्यादी योगेश शंकर देवखिळे रा.लोणीव्यंकनाथ ता. श्रीगोंदा यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, त्यांचे मालकीची ७०हजार रु. किमतीची बुलेट मोटार सायकल क्रमांक एम.एच.१६ बी. आर. ९०११ ही त्याचे घरासमोरुन अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली सोबत गावातील काही व्यक्तींचे मोबाईल चोरी गेले होते. त्याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गु.रजि नं. १७०/२०२१ भा.द.वि.क ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास चालु असताना तांत्रिक तपासाच्या आधारे मिळालेल्या माहीतीवरुन रेकॉर्डवरील सराईत वाहन चोर शंकर उर्फ हाड्या मधुकर पवार रा.पेनुर ता.मोहोळ जि.सोलापुर हल्ली मु. भुम ता. भुम जि. उस्मानाबाद यास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी भुम येथुन ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता त्याने त्याचे इतर दोन फरार साथीदारांसोबत सदर गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्ह्यात चोरलेली बुलेट, मोबाईल, सोलापुर व पुणे जिल्ह्यातुन चोरलेल्या एकुण ५ मोटार सायकली व दोन मोबाईल असा एकुण ४लाख १०हजार रु. किंमतीचा मुद्देमाल श्रीगोंदा पोलिसांनी हस्तगत केला आहे.रेकॉर्डवरील सराईत वाहन चोर शंकर उर्फ हाड्या मधुकर पवार रा.पेनुर ता.मोहोळ जि.सोलापुर हल्ली मु. भुम ता. भुम जि. उस्मानाबाद याचेवर १८ विविध प्रकारचे गुन्हे दाखल असुन आरोपीकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सदरची कारवाई ही श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि दिलीप तेजनकर, पो.हे.कॉ.अंकुश ढवळे, पो.कॉ. प्रकाश मांडगे, पो.कॉ गोकुळ इंगवले, पो.कॉ.दादा टाके, पो.कॉ. किरण बोराडे, पो.कॉ. प्रशांत राठोड यांनी केली असुन तसेच सदर गुन्ह्याचा तपास पो.हे.कॉ विठ्ठल बडे व पो.कॉ. संदिप शिरसाठ हे करीत आहेत.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे