कर्जत दि १९ :- कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असताना अवैद्य धंद्यावाल्यांना याचे थोडेही गांभीर्य दिसून येत नाही.त्यामुळे कर्जत पोलिसांचा अवैध धंद्यावर धाड़सत्र सुरुच आहे. अवैध धंद्यांच्या विरोधात पोलिसांची मोहीम जोरात सुरु असून धाडी टाकून अवैध धंद्यांना चाप लावण्याचे काम कर्जत पोलिसांकडून सुरु आहे.अवैद्य मार्गाने दारु विक्री सुरु असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला.तसेच अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली असुन त्यात राजेंद्र माणिक होलम, दस्तगीर इस्माईल सय्यद,रामदास कोंडीबा होलम, शरद दत्तात्रेय पवार,भीमराव दत्तू चव्हाण, सर्व रा.भांबोरा
व मधुकर यशवंत लोंढे रा.आळसुंदे यांच्यावर अवैधरित्या जुगार खेळत व खेळवीत असल्यामुळे कारवाई करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातील एकूण ४९५१०रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कर्जत पोलिसांनी हातभट्टी दारु विक्री करणारे तीन जण ताब्यात घेतले असून शकुंतला राजैया गोनीवार, कर्जत,बबन भीमराव तागडकर, मिरजगाव,शैलेश अनिल गोरले, राशीन या तिघांवर अवैध दारू विक्री करत असल्यामुळे कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ११५६० रु.किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट,पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, सलीम शेख, तुळशीराम सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल सुनील खैरे, गोवर्धन कदम, श्याम जाधव, भाऊसाहेब काळे, सागर म्हेत्रे, गणेश भागडे, तिकटे यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे